केएल राहुलचे आथियाच्या आधी दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत जोडले होते नाव

टीम ई-सकाळ
Thursday, 27 August 2020

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना अनेकांच्या डेटिंग आणि ब्रेक अप संदर्भात नेहमीच अफवा उठत असतात. बॉलिवूड अभिनेत्रींची नावे अनेकदा क्रिकेटपटूंशी जोडली जातात.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना अनेकांच्या डेटिंग आणि ब्रेक अप संदर्भात नेहमीच अफवा उठत असतात. बॉलिवूड अभिनेत्रींची नावे अनेकदा क्रिकेटपटूंशी जोडली जातात. काही वर्षांपूर्वीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री सारा अली खान पासून ते दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल पर्यंत सर्वांच्याच अशा अफवा येत असतात. काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल' सिनेमात आणि श्री. मजनूसारख्या अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या निधी अग्रवालचे नाव भारतीय संघाचा क्रिकेटपटू के.एल. राहुल सोबत जोडले जात होते. मात्र त्यानंतर आता के.एल. राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ECB ने अति उत्साहात भारतासह इतर देशांचा केला अपमान, अँडरसनच्या पायाखाली दाखवले राष्ट्रध्वज

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू  के.एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे गेल्या काही दिवसांपूर्वीच एका रेस्टोरंट मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. मात्र त्यानंतर या अभिनेत्रीने एका मुलाखतीत क्रिकेटरबरोबर एकत्र डिनरसाठी बाहेर गेल्याचे मान्य केले. परंतु डेट करत असल्याच्या वृत्ताबाबत तिने कोणतीही पुष्टी केली नाही अथवा नाकारली देखील नाही. याशिवाय करिअर सुरू करण्यापूर्वीपासून ते एकमेकांना ओळखत असल्याचे या अभिनेत्रीने सांगितले. 

मात्र, क्रिकेटपटू के.एल. राहुलने करण जोहरच्या चॅट शो मधील 'कॉफी विथ करण'च्या मुलाखती दरम्यान अशा सर्व चर्चांना विराम देत त्या खोट्या असल्याचे सांगितले. यावेळेस राहुल या अभिनेत्रीला एकदाच भेटल्याचे स्पष्ट करत, ती फक्त मैत्रीण असल्याचे म्हटले. यानंतर अभिनेत्री निधी अग्रवालने देखील एका शो दरम्यान आपण सिंगल असल्याचे म्हटले आहे. तसेच दिवसभरात पूर्णतः व्यस्त असल्यामुळे फोन देखील पाहत नसल्याचे म्हणत, सिंगलच खूप आनंदी असल्याचे सांगितले. 

दोन चाचण्यांनंतर निशिकोरीच्या तिसऱ्या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह ;  तरीही यूएस ओपन मधून माघार 

दरम्यान, काल अथिया शेट्टीने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर  स्विमवेअरमधील फोटो शेअर केला. त्याचवेळी के.एल. राहुलने अथिया शेट्टीच्या या पोस्टवर कंमेंट केली. आणि के.एल. राहुलने केलेल्या या कंमेंटमुळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेला सुरवात झाली. अथियाच्या स्विमवेअरच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुलने 'जेफा' असे लिहिले आहे. त्यामुळे राहुलच्या या कंमेंटवर चाहते चांगलेच गोंधळले आहेत. व महत्त्वाचे म्हणजे याअगोदर देखील के.एल. राहुलने अथिया शेट्टीच्या फोटोवर कंमेंट केल्या आहेत. तर, त्याचवेळी अथियाने देखील राहुलच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर तिने विश करताना 'माय पर्सन' असे लिहिले होते.


​ ​

संबंधित बातम्या