केएल राहुलच्या पोस्टवर अथियाचा जबऱ्या रिप्लाय होतोय व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 17 November 2020

या फोटोमध्ये त्याने अथियालाही टॅग केले आहे. तिने त्याला रिप्लायही दिल्याचे पाहायला मिळते. अथियाने रिप्लाय देताना लिहिलंय की, 'ग्रेट कार्ड्स' तिच्या रिप्लायची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  यापूर्वी लोकेश राहुलनं अथियाच्या बर्थडे दिवशी एक फोटो शेअर केला होता. त्याने अथियाचा पागल बच्चे असे म्हटले होते. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. 

AusvsInd: आयपीएलनंतर लोकेश राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झालाय. दौऱ्यावर पोहचलेला केएल राहुल  (KL Rahul) कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) मिस करतोय. लोकेश राहुलनं सोशल मीडियावरु एक फोटो शेअर केला आहे.  यूनो कार्ड खेळताना काही खास मित्रांना मिस करतोय, या कॅप्शनसह  त्याने हा फोटो शेअर केलाय. 

या फोटोमध्ये त्याने अथियालाही टॅग केले आहे. तिने त्याला रिप्लायही दिल्याचे पाहायला मिळते. अथियाने रिप्लाय देताना लिहिलंय की, 'ग्रेट कार्ड्स' तिच्या रिप्लायची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  यापूर्वी लोकेश राहुलनं अथियाच्या बर्थडे दिवशी एक फोटो शेअर केला होता. त्याने अथियाचा पागल बच्चे असे म्हटले होते. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. 

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जवळपास दोन महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यात लोकेश राहुलवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वनडे आणि टी-20 सामन्यात लोकेश राहुलकडे भारतीय संघाचे उप-कर्णधारपद देण्यात आले आहे.  आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. पण किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्याच्या नेतृत्वाखालील संघ साखळी फेरीतच गारद झाला होता. 
 
​ ​

संबंधित बातम्या