ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या युवा क्रिकेटरने उडवला लग्नाचा बार!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

वरुण चक्रवर्तीच्या लग्नाला मोजकी आणि अगदी जवळची मंडळीच उपस्थितीत होती. सोशल मीडियावर वरुण चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीचा फोटो समोर आल्यानंतर मिस्ट्री स्पिनरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय.

KKR Varun Chakravarthy Marred : आयपीएल 2020 (IPL 2020) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना लक्षवेधी खेळ करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली. चेन्नईत मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत तो गर्लफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकला. प्रथम श्रेणीतील क्रिकेटर अरुण कार्तिकने चक्रवर्तीच्या विवाहाचा खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. 

वरुण चक्रवर्तीच्या लग्नाला मोजकी आणि अगदी जवळची मंडळीच उपस्थितीत होती. सोशल मीडियावर वरुण चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीचा फोटो समोर आल्यानंतर मिस्ट्री स्पिनरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत चक्रवर्तीने दमदार कामगिरी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड झाली. पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. अखेरच्या क्षणाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघात त्याच्या जागेवर टी नटराजनची वर्णी लागली होती.  

होणाऱ्या बायकोसाठी कायपण! क्रिकेटपटू उचलणार मोठं पाऊल

युएईत रंगलेल्या हंगामात त्याने 13 सामन्यात 17 विकेट घेत ब्लू जर्सीत खेळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते. वरुण केकेआरमध्ये सामील होण्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातही सहभागी होता. पण या संघातून त्याला फारशी संधी मिळाली नव्हती.  


​ ​

संबंधित बातम्या