शाकिबच्या माफिनाम्यावर कंगनाकडून प्रश्नांचा भडीमार

सकाळ स्पोर्टस्
Wednesday, 18 November 2020

याप्रकरणात शाकिबने माफिनामा दिल्यानंतर कंगनाने आपले मत मांडले आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलंय की, मंदिरांना एवढं का घाबरता? उगाच कोणी घाबरत नाही, आम्ही जन्मभर मस्जिदमध्ये राहुनही राम नामाचा जप विसरणार नाही. स्वत:च्या धर्मावर विश्वास नाही की भूतकाळातील धर्म तुम्हाला मंदिराकडे आकर्षित करतो? अशा प्रश्नांचा कंगनाने भडिमार केलाय.  

बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन वादग्रस्त मुद्यावरुन चर्चेत आहे. मागील आठवड्यात तो भारतामध्ये झालेल्या एका काली पूजेला उपस्थितीत राहिला होता. यावरुन चांगलाच वाद पेटला. काही कट्टरपंथियांनी त्याला धमकी देखील दिली. शाकिबला यासंदर्भात माफी मागावी लागली. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने उडी घेतली आहे. मंदिराची एवढी भिती का वाटते? असा प्रश्न उपस्थिती करुन कंगनामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काली पूजाला उपस्थिती लावल्याने एका इसमाने शाकिबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला अटकही करण्यात आली आहे. 

धवनमध्ये भाईजान घुसला; डान्सिंग स्टेप एकदा पाहाच (VIDEO)

याप्रकरणात शाकिबने माफिनामा दिल्यानंतर कंगनाने आपले मत मांडले आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलंय की, मंदिरांना एवढं का घाबरता? उगाच कोणी घाबरत नाही, आम्ही जन्मभर मस्जिदमध्ये राहुनही राम नामाचा जप विसरणार नाही. स्वत:च्या धर्मावर विश्वास नाही की भूतकाळातील धर्म तुम्हाला मंदिराकडे आकर्षित करतो? अशा प्रश्नांचा कंगनाने भडिमार केलाय.  

INDvsAUS : विराटच्या विरोधात ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे रणशिंग

शाकिब अल हसन हिंदू धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर शाकिबच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ 2 मिनिटे होतो. काही लोकांना मी या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचे वाटले. मात्र तसे काहीही झालेले नाही. जागरुक मुस्लिम असल्याचे सांगत त्याने धर्म भावना दुखावणारी कोणतीही गोष्ट करणार नाही, असे म्हणत त्याने माफी मागितली होती.  

​ ​

संबंधित बातम्या