बायडेन यांच्या विजयानंतर जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) पराभूत करत बायडेन (Joe Biden) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष झाले. ही निवडणुक कोण जिंकणार याकडे जगभराचे लक्ष लागून होते. निकालानंतर क्रिडा क्षेत्रातूनही नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
Archer Tweet on Joe Biden : जग कोरोनातून सावरत असताना नोव्हेंबरमध्ये मोठ्या घडामोडी अनुभवायला मिळत आहेत. देशात बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलचा जेतेपद कोण पटकावणार ही चर्चा सुरु असताना अमेरिकेत सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळाले.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करुन दाखवले. डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) पराभूत करत बायडेन (Joe Biden) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष झाले. ही निवडणुक कोण जिंकणार याकडे जगभराचे लक्ष लागून होते. निकालानंतर क्रिडा क्षेत्रातूनही नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
मात्र सर्वात लक्षवेधी ठरत आहे ते जोफ्रा आर्चरचे ट्विट. जोफ्राने 6 वर्षांपर्वीच अमेरिकेत सत्तांतर होणार असल्याची भविष्यवाणी केली होती, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत अकाउंटवरुन देखील त्याचे ट्विट शेअर करण्यात आले आहे.
Joe!
— Jofra Archer (@JofraArcher) October 4, 2014
डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) पराभूत करत बायडेन (Joe Biden) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष झाले. ही निवडणुक कोण जिंकणार याकडे जगभराचे लक्ष लागून होते. निकालानंतर क्रिडा क्षेत्रातूनही नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
इंग्लंडचा जलदगती गोलंदाज आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून दिसलेल्या जोफ्रा आर्चरचे एक ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. 2014 मध्ये जोफ्राने Joe असे ट्विट केले होते. त्याचे हे ट्विट अमेरिकेच्या निकालानंतर चर्चेत आले आहे. जोफ्रा आर्चरने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बायडेन दिसणार हे 6 वर्षांपूर्वीच सांगितल्याचे बोलले जात आहे. आयपीएल 2020 मध्ये जोफ्राने कमालीची कामगिरी केली होती. मात्र त्याचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. 14 सामन्यात जोफ्राने 20 विकेट घेतल्या.