संजना...आय लव्ह यू! बुमराहची नवरी बनून नटणारी सुंदरी कोण?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 8 March 2021

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन ही दोन नावे सोशल मीडियावर सर्च करण्यास सुरुवात झाली. 

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. बुमराहने चौथ्या कसोटी सामन्यासह इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. त्याची नवरी कोण यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. यात दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन ही दोन नावे सोशल मीडियावर सर्च करण्यास सुरुवात झाली. 

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमाने जसप्रितसोबतची केवळ मैत्री असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता तिच्या आईने हे वृत्त खोडून काढले. त्यामुळे तो जिच्यासोबत लग्न करणार आहे ती संजनाच आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणही पक्के झाल्याचे वृत्त अनेक माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोघांच्या कुटुंबियांकडून मात्र यासंदर्भात मौन बाळगण्यात आल्याचे दिसते. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, क्रीडा क्षेत्राशी निगडीत असणारे हे कपल गोव्याच्या एका हॉटेलमध्ये 14 किंवा 15 मार्चरोजी विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात होते.    

May be an image of one or more people and people standing

28 वर्षीय संजना गणेशन एक स्पोर्ट्स अँकर आहे. मागील काही काळापासून अनेक क्रिकेट सामन्यावेळी ती मैदानात दिसली आहे.  आयपीएलसह ती स्टार स्पोर्ट्सवर सक्रीय दिसते.

May be an image of Sakhare Pooja

संजनाने आयसीसी वर्ल्ड कप 2019 पासून ते इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील कार्यक्रमात अँकरिंग करताना दिसली आहे.

May be an image of 1 person and standing

कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणूनही तिने काम पाहिले आहे.

May be an image of 1 person and standing

संजनाने  2013 मध्ये फेमिना गॉर्जियस स्पर्धा जिंकली होती.

May be an image of 1 person and ocean

 एमटीव्हीवरील RealiTy Show मधून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

May be an image of 1 person and jewelry

संजनाने पुण्यातील प्रसिद्ध विद्यापीठातून इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहचली होती.


​ ​

संबंधित बातम्या