बुमराह लग्नाच्या सुट्टीवर; कोणी घेतली यॉर्कर किंगची विकेट?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

तो कोणासोबत विवाह करणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढेच नव्हे लग्नाचे स्थळासंदर्भातही गोपनियता बाळगण्यात आलीय. 

jasprit bumrah getting  married : कसोटी क्रिकेट मालिका अर्ध्यावर सोडून जसप्रित बुमराह घरी परतला आहे. वैयक्तिक कारणास्तव बुमराह आगामी कसोटी सामन्यात खेळणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही बुमराह उपलब्ध नसल्याचे समजते. बुमराहने नेमकी कशासाठी सुट्टी घेतली आहे याचे कारण आता समोर आले आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तो कोणासोबत विवाह करणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढेच नव्हे लग्नाचे स्थळासंदर्भातही गोपनियता बाळगण्यात आलीय. 
 

बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्रीयांच्या प्रेमाची चर्चा
May be a closeup of 1 person, hair and outdoors

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन anupama parameswaran यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या. बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचे समोर आल्यानंतर तो अनुपमाशी विवाह करणार का? अशी चर्चा सोशn मीडियावर रंगताना दिसत आहे. अनुपमा आणि जसप्रीत बुमराहा फेसबुक फ्रेंड आहेत. एकमेकांच्या पोस्ट लाईक केल्यामुळे या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. अनुपमाने आमच्यात केवळ मैत्री असल्याचे सांगत वृत्त फेटाळले होते. 
May be an image of 1 person and smiling

 

स्पोर्ट्स अँकरसोबत विवाह?
बुमराहने पार्टनर म्हणून कोणाची निवड केलीय. हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  तो स्पोर्ट्स अँकरसोबत विवाह करणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. बुमराह यासंदर्भात काही बोलणार की सोशल मीडियावरील फोटोतूनच त्याची विकेट कोणी घेतली कळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या