ड्वेन ब्रावोच्या हिट गाण्यामागे साक्षीची कल्पकता!

सुशांत जाधव
Friday, 28 August 2020

ब्रावोने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले. गाण्यासंदर्भात महेंद्र सिंह धोनीसह त्याची पत्नी साक्षीकडून प्रतिक्रिया मिळाली. गाण्याच्या टायटलमागे साक्षीची कल्पना होती, असे त्याने सांगितले.

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटर ड्वेन ब्रावो सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीसह त्याने टी-20 मध्ये 500 गडी बाद करण्याचा टप्पाही पूर्ण केला. झटपट क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. मैदानातील कामगिरीशिवाय ड्वेन ब्रावो त्याच्या अल्बममुळेही प्रकाश झोतात असतो. चेन्नईकडून खेळणाऱ्या डीजे ब्रावोने आपल्या कर्णधाराच्या वाढदिवसाच्या निमित्त अनोखी भेट दिली होती. धोनीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर त्याने एक अल्बम तयार केला होता. डीजे ब्रोवोच्या या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. या गाण्याला त्याने 'हेलिकॉप्टर 7' असे टायटल दिले होते. गाण्याला हे नाव देण्यामागे धोनीची पत्नी साक्षीची मदत घेतल्याचे ब्रोवोने म्हटले आहे. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

ब्रावोने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले. गाण्यासंदर्भात महेंद्र सिंह धोनीसह त्याची पत्नी साक्षीकडून प्रतिक्रिया मिळाली. गाण्याच्या टायटलमागे साक्षीची कल्पना होती, असे त्याने सांगितले. या गाण्याला मी केवळ 'नंबर 7' असे नाव देणार होता. पण साक्षीच्या कल्पनेतून हेलिकॉप्टर हा शब्द जोडला गेला, असे तो म्हणाला. धोनीवर गाणे तयार केल्याचा खूप आनंद वाटतो, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. डीजे ब्रोवोने तयार केलेल्या गाण्याला अल्पावधीतच लाखो लोकांनी पसंती दर्शवली होती. धोनीने खेळात सुधारणा करण्यास मदत केली. त्यामुळे निवृत्तीपूर्वी धोनीवर गाणे तयार करण्याचे ठरवले होते, असेही त्याने सांगितले.     

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडूने कॅरेबियन लीगमध्ये लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 500 बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला. या प्रकारात आतापर्यंत कोणालाही हा पल्ला  गाठता आलेला नाही. आयपीएलमध्ये तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो. 113 सामन्यात त्याच्या नावे 118 विकेट्सची नोंद आहे.  


​ ​

संबंधित बातम्या