IPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक-कृणाल आणि त्या दोघींच्या भन्नाट डान्सची चर्चा (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. काही खेळाडूंच्या पत्नी आणि मुलेही या बायोबलचा आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच लढती रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने तीन सामन्यातील दोन विजयासह पॉइंट टेबलमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. खेळाडू मैदानातील कामगिरीसह मैदानाबाहेरील अक्टिव्हिटीमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ऑल राउडर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोघांच्या बायका (पत्नी) स्टेडियममध्ये सामने पाहायला हजेरी लावताना दिसत आहे. मॅच दरम्यान प्रेक्षक गॅलरीतून मुंबई इंडियन्स आणि पांड्या बंधूंना प्रोत्साहन देणारी नताशा स्टेनकोविच सोशल मीडियावरील पोस्टनेही चाहत्यांचे लक्षवेधून घेताना पाहायला मिळते.  

IPL 2021 : रसेलनं जाणूनबुजून धावबाद नाही केलं? पाहा Video

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. काही खेळाडूंच्या पत्नी आणि मुलेही या बायोबलचा आहेत. अनेक खेळाडूंनी आपल्या पत्नीला सोबतच स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पांड्या बंधूंच्या पत्नीही या बायोबबलचा भाग आहेत. मॅच प्रॅक्टिसनंतर हार्दिक पांड्याने पत्नी नताशा आणि कृणालने पत्नी पंखुडी शर्मासोबत जस्टिन बीबरच्या गाण्यावर ठुमके लगावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

खुद्द हार्दिक पांड्याने आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केलाय. यात हार्दिक-नताशा जोडीसोबत  कृणाल आणि त्याची पत्नी पंखुडी शर्माही दिसते. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन चौघांचा फोटोही शेअर केला आहे. 'द पांड्या स्वॅग'. या कॅप्शनसह शेअर केलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओत पांड्या ब्रदर्स, नताशा आणि पंखुडी सर्वजण एकाच ड्रेसमध्ये दिसतात. त्यांच्या टी- शर्ट वरील स्माईलीप्रमाणेच हा डान्स पाहणाऱ्यालाही हसू आणणाऱ्या स्टेप्स त्यांनी केल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या