विरुष्कासोबत 'टकाटक' क्लिकसाठी फोटोग्रारला घ्यावी लागली एक्स्ट्रा मेहनत

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

मोहित कश्यपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून  सेलिब्रेशनवेळीचा खास किस्सा शेअर केलाय. या फोटोत मोहित कश्यप हा विराट-अनुष्कासोबतच्या फोटोत दिसत आहे. या फोटोत कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही.  फोटो क्लिक करताना सर्वांच्या चेहऱ्यावर फ्लॅश लाइट पडल्याचे पाहायला मिळते. कश्यपनं या फोटोसह एक खास ट्विट केले आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासह टीम संदस्यांसोबत 32 वा वाढदिवस साजरा केला. कोहलीच्या 'विराट' बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा वाढदिवस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं प्ले ऑफमध्ये मिळवलेलं स्थान या घटनांच्या पार्श्वभूमीवर जंगी पार्टी झाली. यावेळी आरसीबीचा फोटोग्राफर मोहित कश्यपला विराट आणि अनुष्कासोबत एक चांगला फोटो घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. 

मोहित कश्यपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून  सेलिब्रेशनवेळीचा खास किस्सा शेअर केलाय. या फोटोत मोहित कश्यप हा विराट-अनुष्कासोबतच्या फोटोत दिसत आहे. या फोटोत कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही.  फोटो क्लिक करताना सर्वांच्या चेहऱ्यावर फ्लॅश लाइट पडल्याचे पाहायला मिळते. कश्यपनं या फोटोसह एक खास ट्विट केले आहे.

धनश्रीनं शेअर केला 'विराट' बर्थडे सेलिब्रेशनचा फोटा

जेव्हा लोक मला स्वत:चा चांगला फोटो नाही का? असा प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो की, कोणी माझे चांगले फोटो काढतच नाही. विराट-अनुष्कासोबतचा हा फोटो त्याचा पुरावाच आहे, असे ट्विट कश्यपनं केलं आहे. फ्लॅश लाइट पडलेल्या फोटो त्याने एडिट करुन आपल्याती स्किलही दाखवून दिले आहे. सर्वात चांगला रिपेअरिंग जॉब, असे म्हणत त्याने दुसरा फोटोही शेअर केलाय. यात तिघांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. 

यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दमदार सुरुवात केली. पहिल्या 10 पैकी 7 सामन्यात विजय नोंदवला. पण त्यांची गाडी अडकली ते पुन्हा स्टार्ट झालीच नाही. साखळी सामन्यातील उर्वरित 4 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला. केकेआरपेक्षा रनरेट उत्तम असल्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. पण सनरायझर्स हैदराबादने त्यांना पराभूत करत स्पर्धेतून आउट केले.  
 


​ ​

संबंधित बातम्या