मुंबई इंडियन्सनं शेअर केला रोहित-रितिका आणि त्यांच्या लेकीचा खास फोटो

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षातील आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत समोर आलेल्या फोटोनुसार रोहित शर्मा असा एकमेव खेळाडू आहे जो पत्नी आणि मुलगीला घेऊन आयपीएलसाठी रवाना झालाय.

दुबई : इंडिय प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वात लोकप्रिय असलेली मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आपला रुबाब कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास सज्ज आहे. आतापर्यंत त्यांनी सर्वाधिक  4 वेळा या स्पर्धेत जेतेपद मिळवून विक्रम प्रस्थापित केलाय. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देताना आयपीएल वेळापत्रक निश्चित होण्यापूर्वी रोहित शर्माने 19 सप्टेंबरला नाणेफेकीला भेटू, असे ट्विट केले होते. हा सामन्याची दोन्ही संघाच्या चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. 

IPL 2020 : रैना-भज्जीशिवाय सलामीच्या सामन्यात कसा असेल धोनीचा प्लेइंग इलेव्हन

स्पर्धत निर्विवाद वर्चस्व दाखवून देण्यासाठी प्रत्येक संघ कसून सराव करत आहे. सरावादरम्यान खेळाडू आनंददायी क्षणही अनुभवत आहेत. रोहित शर्माचा असाच एक फोटो मुंबई इंडियन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. यात कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत बीचवर आनंदी क्षण घालवताना पाहायला मिळत आहे. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

UAE त रंगणाऱ्या IPL चं संपूर्ण वेळापत्रक, आबूधाबीच्या मैदानात रंगणार सलमीचा सामना​

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षातील आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत समोर आलेल्या फोटोनुसार रोहित शर्मा असा एकमेव खेळाडू आहे जो पत्नी आणि मुलगीला घेऊन आयपीएलसाठी रवाना झालाय. मार्च महिन्यापासून क्रिकेटला पूर्णपणे ब्रेक लागला असून रोहित शर्माही इतर खेळाडूंप्रमाणे मोठ्या विश्रांतीनंतर आयपीएच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी कुटुंबियांना सोबत आणावे की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयने फ्रेंचायजींना दिले होते. मुंबई इंडियन्स एकमेव आहे की ज्यांनी खेळाडूंना कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी दिली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या