धोनीच्या खांदयावरुन महिला क्रिकेटरचा विराटवर निशाणा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 9 November 2020

 RCBच्या अपयशानंतर भारताचा माजी क्रिकेटर संजय माजरेकर आणि गौतम गंभीर यांनी विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर  इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉस हीनं RCBला ट्रोल केलं. संघसहकारी एलेक्झांड्रा हार्टली हिच्या ट्विटवर रिप्लाय देताना क्रॉसनं MS Dhoniच्या  ‘definitely not’ या शब्दांचा सहारा घेतला आहे. 

Indian Premier League (IPL) 2020 च्या 13 व्या हंगामात दमदार सुरुवातीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( Royal Challengers Bangalore) अखेरच्या टप्प्यात ढेपाळला. त्यांचे आव्हान एलिमिनेटरमध्येच संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाने विराट कोहलीच्या बंगळुरु संघाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. IPL च्या आतापर्यंतच्या हंगामात संघाला एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले.  

फ्रेंच फुटबॉल लीग : डी मारियोच्या दोन गोलमुळे पीएसजीचा रेनेसवर विजय

RCBच्या अपयशानंतर भारताचा माजी क्रिकेटर संजय माजरेकर आणि गौतम गंभीर यांनी विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर  इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉस हीनं RCBला ट्रोल केलं. संघसहकारी एलेक्झांड्रा हार्टली हिच्या ट्विटवर रिप्लाय देताना क्रॉसनं MS Dhoniच्या  ‘definitely not’ या शब्दांचा सहारा घेतला आहे.

ब्रेट ली हा पेस आयकॉन ; मास्टर ब्लास्टर कडून खास शुभेच्छा  

चेन्नई  सुपर किंग्सच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर धोनीला चेन्नईकडून तुझा अखेरचा सामना आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी धोनीने ‘definitely not’ असे सांगत पुढील हंगामातही चेन्नईकडून खेळण्याचे स्पष्ट केले होते. धोनी ज्याप्रमाणे निवृत्ती घेणार नाही त्याप्रमाणे विराट कोहलीही कर्णधारपद सोडणार नाही, असे इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटून RCB च्या संदर्भात म्हटले आहे.  

​ ​

संबंधित बातम्या