IPLची मिस्ट्री गर्ल मिळाली; मुंबईच्या खेळाडूची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Monday, 19 October 2020

मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील थरारक सामन्यात आयपीएलमधील मिस्ट्री गर्ल मिळाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावातून सावरत यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. कोरोनामुले यंदाच्या वर्षी सुरु असलेल्या स्पर्धेचा रंगच बदलला आहे. प्रेक्षकांशिवाय रंगलेल्या स्पर्धेत आतापर्यंत चार सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील निकाल लावण्यासाठी तब्बल दोन सुपर ओव्हरचा खेळ रंगला. आयपीएलच्याच नव्हे तर क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्याची  ही पहिलीच वेळ ठरली.  

IPL MI vs KXIP : दोन सुपर ओव्हरनंतर पंजाबनं मुंबईला हारवून दाखवलं

अखेरच्या षटकातील नाट्यमय घडामोडीनंतर सुपर ओव्हरमध्ये फेकल्या गेलेल्या प्रत्येक चेंडूवर समीकरणे बदलताना क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना सामन्यासाठी येण्याची परवानगी दिलेली नाही. काही मोजकी मंडळी सामन्याला हजेरी लावताना दिसत आहेत. 

मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील थरारक सामन्यात आयपीएलमधील मिस्ट्री गर्ल मिळाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाच्या हंगामातही आयपीएलमधील मिस्ट्री गर्ल मिळाल्या भावना व्यक्त करत रविवारच्या सामन्यादरम्यान कॅमरामॅननं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

IPL 2020 SRHvs KKR : निकाल सुपर ओव्हमध्ये!

किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयासाठी 1 चेंडूत दोन धावा हव्या होत्या. त्यावेळी कॅमेरा मॅनने मोजक्या मंडळींकडे कॅमेरा पॅन केला आणि टीव्ही स्क्रीनवर सुंदर तरुणी दिसली. त्यानंतर या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतील तरुणीचं नाव काय आणि ती कोण? यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ती तरुणी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असलेल्या इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर रिया लालवानी नावाने असणारे अकाउंट संबंधित तरुणीचे असल्याचा दावाही करण्यात येत आहे. या अकाउंटवर 18 हजार फॉलोअर्स आहेत. सामन्यानंतर व्हायरल होणारे फोटा या इन्टा अकाउंटच्या स्टोरीवर झळकले होते.  


​ ​

संबंधित बातम्या