IPL 2020: RCB च्या सुपर विजयानंतर 'प्रेग्नंट लेडी' अनुष्काच्या रिअ‍ॅक्शनची चर्चा

सुशांत जाधव
Tuesday, 29 September 2020

आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने तिच्या अधिकृक इन्स्टाग्राम अकांउटच्या माध्यमातून खास स्टोरी पोस्ट केली होती. एका गर्भवती महिलेसाठी हा विजय रोमहर्षक होता. टीमची कामगिरी खुपच भारी होती;

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला (MI) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. या सामन्यासंदर्भात विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.  

आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने तिच्या अधिकृक इन्स्टाग्राम अकांउटच्या माध्यमातून खास स्टोरी पोस्ट केली होती. एका गर्भवती महिलेसाठी हा विजय रोमहर्षक होता. टीमची कामगिरी खुपच भारी होती; अशा आशयाची पोस्ट तिने शेअर करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसाठी तिने हार्टवाली इमोजी वापरल्याचे दिसते. अनुष्काची ही इन्स्टा स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक नेटकरी याला पसंती देताना पाहायला मिळते.  

Image

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या होत्या. या डावात कर्णधार विराट कोहलीला समाधानकारक खेळ करता आला नाही. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची आघाडीही बारगळली. त्यानंतर युवा इशान किशन आणि पोलार्डने मुंबई इंडियन्सला सामन्यात आणले. ही जोडी संघाला जिंकून देईल, असे चित्र निर्माण झाले असताना इशान किशन 99 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर सुपर पोलार्डच्या चौकारामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या चौकाराने बंगळुरुच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला होता.  


​ ​

संबंधित बातम्या