स्टेडियमध्ये रंगला प्रेमाचा खेळ; भारतीयाने ऑस्ट्रेलियन महिलेला केलं प्रपोज

सकाळ ऑनलाईन
Sunday, 29 November 2020

भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. भारताच्या डावीतील 20 व्या षटकात स्टेडियममध्ये प्रेम कहाणी फुलत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाने चक्क भरलेल्या स्टेडियममध्ये तरुणीला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. प्रपोज करणारा तरुण हा भारतीय जर्सी घालून होता. तर महिला ऑस्ट्रेलियन जर्सी घालून यजमान  संघाचे समर्थन करताना दिसली. तरुणाने दिलेली अंगठी स्वीकारत तरुणीने भरल्या स्टेडियमवर प्रेमाला होकार दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा एकदा धावांची बरसात केली.  स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत नेण्यात महत्त्वपूर्ण बजावली. स्मिथच्या खेळी बहरलेल्या खेळीने ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले लक्ष्य भारतीय संघ पार करणार का चर्चा रंगत असताना स्टेडियममध्ये प्रेम फुलल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.   

AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. भारताच्या डावीतील 20 व्या षटकात स्टेडियममध्ये प्रेम कहाणी फुलत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाने चक्क भरलेल्या स्टेडियममध्ये तरुणीला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. प्रपोज करणारा तरुण हा भारतीय जर्सी घालून होता. तर महिला ऑस्ट्रेलियन जर्सी घालून यजमान  संघाचे समर्थन करताना दिसली. तरुणाने दिलेली अंगठी स्वीकारत तरुणीने भरल्या स्टेडियमवर प्रेमाला होकार दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

AUSvsIND Record : टीम इंडियातील गोलंदाजांच्या फ्लॉपशोची 'पंचमी'

क्रिकेटच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आल्यानंतर असा प्रकार पाहायला मिळाल्याची ही पहिला घटना नाही. यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार पाहायला मिळाले आहेत.  2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. याशिवाय कोरोनानंतर क्रिकेटची स्टेडियम प्रेक्षकांसाठी खुली होणारी ही पहिलीच मालिका आहे.

​ ​

संबंधित बातम्या