हिटमॅनने चहलला टाकली गुगली; ट्विट होतंय व्हायरल  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्मा सोबत लग्न केले.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्मा सोबत लग्न केले. युजवेंद्र चहलने गुरुग्राम मध्ये आपल्या मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धनश्री वर्मासोबत लग्न केले. आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. यावर क्रिकेट जगतातील अनेक जणांनी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माला शुभेच्छा दिल्या. तर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने युजवेंद्र चहलला लग्नाच्या शुभेच्छा देत ट्रोल देखील केले आहे. 

''वेळ आणि स्थानिक नियमांबाबत माहिती नसल्यामुळेच असे घडले'' 

फिरकीपटू युजवेंद्र चहल मंगळवारी धनश्री वर्मा सोबत  विवाह बंधनात अडकला. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला होता. व त्यानंतर या दोघांनीही लग्न केले. क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी युजवेंद्र चहलला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, केदार जाधव यांच्यासह वेस्ट इंडीज संघाचा खेळाडू ख्रिस गेलने युजवेंद्र चहलचे अभिनंदन केले. यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने देखील युजवेंद्र चहलला लग्नाच्या शुभेच्छा देतानाच ट्रोल केले. 

सिडनीत वाढतोय कोरोना; रोहित अपार्टमेंटमधील 2 बेडरुमध्ये क्वारंटाईन

रोहित शर्माने सोशल मीडियाच्या ट्विटरवरील युजवेंद्र चहलच्या लग्नाची पोस्ट रिट्विट करत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ट्विट मध्ये रोहित शर्माने चहलचे अभिनंदन करत, दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. व त्यापुढे रोहित शर्माने मजेत, तू तुझी गुगली तिला न टाकता प्रतिस्पर्धी संघासाठी राखून ठेव, असे चहलला उद्देशून लिहिले आहे.    

युजवेंद्र चहलने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला जाण्यापूर्वी धनश्री वर्मासोबत साखरपुडा केला होता. आणि आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी धनश्री वर्मा दुबईला देखील गेली होती. व त्यावेळी ती युजवेंद्र चहल सहभागी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सपोर्ट देखील करताना पाहायला मिळाले होते. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तसेच ती यू ट्यूबर आहे. व ती सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करत असते.  


​ ​

संबंधित बातम्या