बेबी बंप फोटोसह अनुष्काने शेअर केली मातृत्वाची चाहूल लागल्याची कहाणी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

Vogue च्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्माने ब्रेलेट आणि पँट घातली आहे. याशिवाय क्रीम कलरचा कोटही तिने घातल्याचे पाहायला मिळते.

 Anushka Sharma Baby Bump Pose For Vogue  : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. चित्रपटातील आपल्या हॉट अंदाजांने भल्या भल्यांना घायाळ करणाऱ्या अनुष्काने बेबी बंपची पोझ देत फोटो शूट केले आहे.

मासिकाच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झालेला पोझचा फोटो अनुष्काने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यासोबतच अनुष्काने मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेग्नन्सीचा अनुभवही सांगितला आहे. माझ्यासाठी मातृत्वाचा हा प्रवास अविस्मरणीय आहे. प्रेग्नन्सीच्या काळात अनेक मित्रांचे सहकार्य लाभले. हा क्षण आयुष्यभरासाठी कैद करुन ठेवण्यासारखा आहे.  

Vogue च्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्माने ब्रेलेट आणि पँट घातली आहे. याशिवाय क्रीम कलरचा कोटही तिने घातल्याचे पाहायला मिळते. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या प्रेगन्सीसंदर्भात तिने अनेक गोष्टी मनमोकळे पणाने शेअर केल्या. लॉकडाऊनमुळे बराच काळ घरी होते. त्यामुळे माझ्या प्रेग्नन्सींबाबत कुणालाही माहिती नव्हती. कोरोनाचे संकट एका प्रकारे वरदानही वाटते. कारण विराट माझ्यासोबत होता. प्रेग्नन्सीची गोष्ट मला लपवून ठेवायची होती. त्यामुळे आम्ही फक्त क्लिनिकमध्ये जाण्यासाठीच बाहेर पडायचो. रस्त्यावर किंवा अजूबाजूला त्याकाळात  कोणीच नसायचे त्यामुळे आम्हाला कोणीच पाहायचे नाही, असेही अनुष्काने यावेळी सांगितले. 

हनीमूनला गेलेल्या युजी-धनश्री कपलला जेव्हा धोनी भेटतो...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

गूड न्यूज असल्याचे कधी कळले याविषयी देखील अनुष्काने भाष्य केले. 'बुलबुल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना झुम कॉलवर असताना अचानक समस्या जाणवली. अस्वस्थ आणि अशक्तपणा जाणवल्यानं तिने व्हिडिओ कॉल डिसकनेक्ट केला. या गोष्टीची कल्पना तिने भाऊ कर्णेश शर्मा याला मेसेजवरुन शेअर केली. यावेळी मी सेटवर असते तर ही गोष्ट तेव्हाच सर्वांना कळली असती, असे सांगायलाही अनुष्का विसरली नाही. 


​ ​

संबंधित बातम्या