गुगलचा काही नेम नाही ; शुभमनची पत्नी सर्च केल्यास दिसते सारा तेंडुलकर 

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरचे अजून लग्न झालेले नाही.

Google Search Result For Shubman Gill's Wife Shows Sara Tendulkar एखादी गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काय करता? तर आपण लगेच आपला मोबाईल काढून पहिला गुगल सर्च करतो. आणि गुगलने दिलेली माहिती खरीच आहे म्हणून त्यावर विश्वास देखील ठेवतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की गुगल देखील काही वेळेस त्यावर सर्च केलेली माहिती कनेक्ट करून ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे गुगलने दिलेली माहिती ही तंतोतंत बरोबर असेलच असे नाही ना. आता झाले असे की, काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटू राशिद खानच्या पत्नी विषयी गुगल चुकीची माहिती देत असल्याचे समोर आले होते. 

कॅप्टन कुल धोनी आता बनतोय 'अँग्रीमॅन' 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्या चालू असलेल्या आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी ही अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच फिरकीपटू राशिद खानची पत्नी ही अनुष्का शर्मा असल्याची चुकीची माहिती गुगल देत होते. इतके पुरे नव्हते म्हणून की काय, आता गुगलने नवीनच शोध लावलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या शुभमन गिलच्या पत्नी विषयी  गुगल सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे गुगलकडून झालेला हा गोंधळ सध्यातरी अनाकलनीयच म्हणावा लागेल. 

गोलंदाजांमुळेच जिंकलो ; शिखरकडून रबाडा आणि नॉर्टीजेचे कौतुक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरचे अजून लग्न झालेले नाही. शिवाय सारा ही नेहमीच प्रसार माध्यमांपासून दूर राहत आलेली आहे. याशिवाय ती फार कमी सोशल माध्यमावर सक्रिय असते. मात्र गुगलवर शुभमन गिलच्या पत्नी संबंधित सर्च केल्यास साराचे नाव येत आहे. यामुळे गुगलचे नेमके काय बिघडले आहे हे सध्या तरी कळत नाहीये. कारण राशिद खानची पत्नी सर्च केल्यास अनुष्का शर्मा आणि शुभमन गिलची पत्नी सर्च केल्यास सारा तेंडुलकरचे नाव गुगल दाखवत आहे.    
   


​ ​

संबंधित बातम्या