मॅक्सवेल 10 कोटीची चिअरलीडर; सेहवागच्या बोलंदाजीवर ऑसी खेळाडूची संयमी फटकेबाजी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामातील  पाच फ्लॉप क्रिकेटर्सच्या मुद्यावर चर्चा करताना त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू   ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटीची चीयरलीडर्स असा टोला लगावला होता. मॅक्सवेलनं  13 सामन्यात केवळ 103 धावा केल्या होत्या. 

भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर निवृत्तीनंतरही चर्चेत असणारा चेहरा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळ थांबल्यानतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची बिनधास्त फटकेबाजी अनुभवायला मिळते. आपल्या खास शैलीत टोमणे मारण्यात त्याचा हात सध्याच्या घडीला कोणीच धरणार नाही. आयपीएलच्या हंगामात  'वीरू की बैठक' या खास शोच्या माध्यमातून त्याने प्रत्येक सामन्याचे हटके विश्लेषण केल्याचे पाहायला मिळाले होते.  

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामातील  पाच फ्लॉप क्रिकेटर्सच्या मुद्यावर चर्चा करताना त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू   ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटीची चीयरलीडर्स असा टोला लगावला होता. मॅक्सवेलनं  13 सामन्यात केवळ 103 धावा केल्या होत्या. 

सेहवागच्या टोमण्यामुळे हैराण झालेलो नाही, अशी प्रतिक्रिया आता मॅक्सवेलनं दिली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचे मेंटोर असल्यापासून विरु माझ्यासंदर्भात अशा पद्धतीची वक्तव्ये करत आहेत. अशा वक्तव्यांनी त्याला आनंद मिळत असेल आणि चर्चेत राहण्यासाठी तो हे सर्व करत असेल तर इट्स ओके.. असा टोला मॅक्सवेलनं लगावला आहे.  
 
युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत मॅक्सवेलला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. स्पर्धेत पंजाबच्या संघाला सलग सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. मॅक्सवेल एकाही सामन्यात संघासाठी उपयुक्त खेळी करु शकला नाही. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात मॅक्सवेलला एकही षटकार लगावता आला नाही. 

​ ​

संबंधित बातम्या