अनुष्का शर्माच्या प्रतिक्रियेनंतर गावस्कर यांची सारवासारव 

टीम ई-सकाळ
Friday, 25 September 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या 13 व्या हंगामात काल गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही संघात सामना झाला.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या 13 व्या हंगामात काल गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही संघात सामना झाला. ज्यामध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा लाजिरवाणा पराभव केला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली कोणतीही खास कामगिरी करू शकला नाही. क्षेत्ररक्षणाच्या वेळेस विराटने केएल राहुलचे दोन झेल सोडले. व यासोबतच फलंदाजीला उतरल्यानंतर देखील विराटच्या बॅट मधून कोणतीही कमाल पाहायला मिळाली नाही. विराटने या सामन्यात फलंदाजी करताना 5 बॉल मध्ये केवळ 1 धाव काढली. त्यामुळे सामन्याच्या वेळेस लाइव्ह कॉमेंट्री करताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराटची पत्नी अनुष्का शर्माचा उल्लेख केला होता. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी केलेल्या कमेंटबद्दल आता वाद निर्माण झाला आहे.    

IPL2020: धोनीचे प्रत्युत्तर की टीकाकार बेदखल?

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाउन मध्ये विराट आणि अनुष्का शर्मा क्रिकेट खेळतानाच्या व्हिडिओचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये गावस्कर यांनी 'विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टीस केली आहे,' असे म्हटले होते. सुनील गावस्कर यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या अनुष्का शर्माने गावस्कर यांना सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिले होते. अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, ''मिस्टर गावस्कर, तुमची ही कमेंट अजिबात आवडली नाही. मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छिते. तुम्ही माझ्या पतीसोबत कटाक्षाने माझे नावही घेतले. मला हे माहित आहे की तुम्ही कित्येक वर्षांपासून क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करत आला आहात. तुम्हाला नाही वाटत का की आम्हीपण यासाठी पात्र आहोत.'' अनुष्का शर्माने केलेली ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल झाली होती.    

इतकेच नाही तर अनुष्काने पुढे, '' तुम्ही वेगळ्या शब्दात देखील माझ्या पतीवर निशाणा साधू शकत होतात. मात्र तुम्ही माझे नाव यात ओढणे हे योग्य आहे का? हे 2020 पासून सुरु आहे मात्र माझ्यासाठी आजही या गोष्टी माझ्याकडून दुर्लक्षित झालेल्या नाहीत. मला विनाकारण क्रिकेटमध्ये ओढले जाते. मी तुमचा खुप आदर करते. तुम्ही या खेळात महान आहात. मी तुम्हाला केवळ एवढेच सांगू इच्छिते की तुम्ही हे समजू शकता, जेव्हा यात माझे नाव ओढले गेले असेल तेव्हा मला काय वाटले असेल?'' असे लिहिले होते. 

यो-यो टेस्ट म्हणजे काय? पंतप्रधान मोदींची कोहलीस विचारणा

त्यानंतर आता सुनील गावस्कर यांनी अनुष्का शर्माच्या उत्तरावर प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये सुनील गावस्कर यांनी विराटच्या अपयशासाठी आपण अनुष्का शर्माला दोष दिला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गावस्कर यांच्या विधानाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर गावस्कर यांच्यावर टीका करताना काही चाहत्यांनी त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर गावस्कर यांच्या कॉमेंट्री व्हिडिओची क्लिप पोस्ट करत, काही चाहते गावस्कर त्यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या