बॉयफ्रेंडवाल्या बाउन्सर प्रश्नावर महिला क्रिकेटरने दिला भन्नाट रिप्लाय

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावरील प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका चाहत्याने तिला बॉयफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर प्रियाने मजेदार रिप्लाय दिला.  

भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा क्रिकेटर प्रिया पुनिया आपल्या धमाकेदार फलंदाजीसोबतच सुंदरतेमुळंही चांगलीच चर्चेत असते. प्रियाची सोशल मीडियावरील फॅन फोलोइंगही मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच प्रियाने इंस्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणाने दिल्याचे पाहायला मिळाले. 

तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावरील प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका चाहत्याने तिला बॉयफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर प्रियाने मजेदार रिप्लाय दिला.  

प्रियाने 2018 मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण केले. ती महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतही सहभागी झाली होती. युएईत रंगलेल्या स्पर्ध तिला खास कामगिरी करता आली नव्हती.  गुरुवारी प्रियाने इंस्टाग्रामवर  'Ask Me Anything' सेशनचे आयोजन केले होते. यावेळी तिने दाक्षिणात्य अभिनेता फेव्हरेट असल्याचे सांगितले. दरम्यान तिला एका चाहत्याने बॉयफ्रेंडसंदर्भात प्रश्न विचारला होता.  यावर तिने जी हावभाव केली त्याची सोशल मीडिवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या गोष्टीपासून ती सध्या तरी दूरच आहे, असेच काहीसे तिची हावभाव सांगून जाते. राजस्थानची प्रिया क्रिकेट खेळण्यापूर्वी बॅडमिंटनच्या ट्रेनिंगलाही जात होती. मात्र करियर म्हणून तिने क्रिकेट निवडले आणि आज ती भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. क्रिकेटर झाले नसते तर बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसले असते, असेही तिने या सेशनमध्ये सांगितले.  


​ ​

संबंधित बातम्या