माजी क्रिकेटर झाला शाहरुख आणि अँकर बनली काजल; DDLJ सीन होतोय व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 14 November 2020

हा फोटो तान्याने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुनही शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तान्‍या पुरोहितनं यापूर्वी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. अनुष्का शर्माची प्रमुख भुमिका असलेल्या नॅशनल हायवे-10 या चित्रपटात ती झळकली होती. आयपीएल 2020 मध्ये कॅमेऱ्यासमोर ती अभिनयाची कलाही सादर करताना दिसली होती.  

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील फायनल लढतीनं आयपीएलची सांगता झाली. मुंबईने धावांचा पाठलाग करताना 5 विकेट राखून सामना जिंकत पाचव्यांदा जेतेपद पटकावले. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमध्ये स्टार स्पोर्ट्स हिंदी वर अँकरिंग करणारी तान्या पुरोहित चांगलीच चर्चेत आली. तान्या पुरोहितने आयपीएल 2020 च्या 13 व्या हंगामातील स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये डेब्यू केला.  

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या या अँकरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत इंग्लंडचा माजी क्रिकेटर ग्रॅमी स्वान तिची ओढणी ओढताना दिसत आहे. आयपीएलच्या दरम्यान ग्रीम स्वान आणि तान्या यांनी शाहरुख खान आणि काजल यांचा सुपर डुप्पर हिट चित्रपट असलेल्या 'दिलवाले' तील एक सीन कॉफी केला होता. 

Facebook Data : IPL मधील चर्चित खेळाडूंमध्ये विराट अव्वल; चॅम्पियन MI वरही पोस्टची बरसात

हा फोटो तान्याने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुनही शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तान्‍या पुरोहितनं यापूर्वी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. अनुष्का शर्माची प्रमुख भुमिका असलेल्या नॅशनल हायवे-10 या चित्रपटात ती झळकली होती. आयपीएल 2020 मध्ये कॅमेऱ्यासमोर ती अभिनयाची कलाही सादर करताना दिसली होती.  

दिग्गज क्रिकेटर म्हणतायेत; T20 मध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी रोहितकडे द्या!

दुसरीकडे इंग्लंड दिग्गज फिरकीपटू ग्रॅमी स्वानने इंग्लंडकडून 60 कसोटी सामन्यात 255 विकेट घेतल्या होत्या. 79 वनडेत त्याने 104 बळी टिपले होते. कॅरेबियन मैदानात 2010 मध्ये रंगलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याने लक्षवेधी खेळी केली होती. इंग्लंडच्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. ग्रॅमी स्वानने 39 टी20 सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. पण त्याच्या कारकिर्दीचा शेवट खूपच दु:खद झाला होता. 2013 मध्ये इंग्लडच्या संघाला एशेस मालिकेत 5-0 असा पराभव स्विकारावा लागला होता.  

​ ​

संबंधित बातम्या