पृथ्वी शॉ करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? सोशल मीडियावर रंगली चर्चा    

टीम ई-सकाळ
Thursday, 10 September 2020

पृथ्वी शॉ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

दिल्ली कॅपिटल संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा देशातील सर्वात प्रतिभावान तरुण क्रिकेटपटू आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार व सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच पृथ्वी शॉने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अंडर 19 वर्ल्ड कपमध्येही भारताचे नेतृत्व केले होते. याशिवाय पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात तरुण चेहऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटलच्या या क्रिकेटपटूचे अद्यापपर्यंत तरी लव्ह लाइफ संदर्भात कोणाशीही नाव जोडलेले नसले तरी, आता मात्र अभिनेत्री प्राची सिंग आणि पृथ्वी शॉ डेट करत असल्याची चर्चा इन्स्टाग्राम वरून सुरु झाली आहे. 

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच 

अभिनेत्री प्राची सिंग उडान या प्रसिद्ध टेलिव्हिजन सिरीयलमध्ये झळकल्यानंतर तिची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर आता पृथ्वी शॉच्या अलीकडील इन्स्टाग्राम पोस्टवर तिने केलेल्या कमेंट्समुळे ती आणि पृथ्वी शॉ हे दोघे मित्रांपेक्षा अधिक असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच पृथ्वी शॉने अपलोड केलेल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर प्राची सिंगने हार्ट चा इमोजी कमेंट मध्ये रिप्लाय केला आहे. व तसेच प्राची सिंगने पृथ्वी शॉच्या काही पोस्टवर सलग कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्याही डेटिंगबद्दलच्या चर्चांना इन्स्टाग्रामवर उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी 'राफेल' विषयी म्हणतो...  

दरम्यान, पृथ्वी शॉ सध्या आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी अमिरातीती असून, काही दिवसांपूर्वीच त्याने सरावाला सुरवात केली आहे. प्राची सिंगने दिलेल्या कमेंट्स वर पृथ्वी शॉने मोजकाच रिप्लाय केला असून याव्यतिरिक्त फक्त लाईक केले आहे. तसेच या दोघांनीही आपल्या नात्यासंदर्भात कोणताही उलगडा केलेला नाही. तर हे दोघेही डेट करत असल्याची माहिती अद्यापपर्यंत मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंग बाबतची जोरदार चर्चा चालू आहे.       


​ ​

संबंधित बातम्या