त्याची मर्जी संभाळायला ती कधीही तयार असते

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

एका रिडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉर्नरची पत्नी कँडिस हिला एका बाऊन्सर प्रश्नाचा मारा करण्यात आला होता. क्रिकेटच्या मैदानातील मोठ्या सामन्यापूर्वी खेळाडू लैंगिक संबंध टाळतात का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर क्रिकेटमधील आपल्या फटकेबाजीशिवाय सोशल मीडियावरील हटके पोस्टमुळंही चर्चेत असतो. वॉर्नरने आपली पत्नी कँडिस आणि लहान मुलींसोबत टॉलीवूड स्टाईल केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा रंगली होती. वॉर्नरचे खेळाप्रती असलेलं प्रेम जगजाहिर आहे.  त्याच्या पत्नीने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टीसंदर्भातील प्रश्नांना एका मुलाखतीमध्ये दिलखुलास उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले.

एका रिडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉर्नरची पत्नी कँडिस हिला एका बाऊन्सर प्रश्नाचा मारा करण्यात आला होता. क्रिकेटच्या मैदानातील मोठ्या सामन्यापूर्वी खेळाडू लैंगिक संबंध टाळतात का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती सापेक्ष असू शकते असे ती म्हणाली. एवढेच नाही तर सामन्याच्या दिवशी वॉर्नरला जे काही करायचे आहे त्यावर मला काहीच हरकत नसते, असे सांगत दोघांच्या नात्यात गोडवा असल्याचे मोकळेपणाने सांगितले. 

डेविड वॉर्नर आणि कँडिस यांचा 2015 मध्ये विवाह झाला. या जोडीला तीन मुली आहेत. सोशल मीडियावर वॉर्नर कुटुंबियांचा धम्माल शो अधून-मधून पाहायला मिळत असतो. बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात नाव आल्यानंतर पत्नीने वॉर्नरला साथ दिली. तिलाही मानसिक त्रास सहन करावा लागला होता. 


​ ​

संबंधित बातम्या