क्रिकेटपटू युझवेंद्र चहल अडकला विवाहबंधनात 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आपली मंगेतर धनश्री वर्मासोबत विवाह बंधनात अडकला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल धनश्री वर्मासोबत विवाह बंधनात अडकला आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनीही लग्न केले असून, युझवेंद्र चहलने सोशल मीडियावरील ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटे शेअर केले आहेत. 

''वेळ आणि स्थानिक नियमांबाबत माहिती नसल्यामुळेच असे घडले'' 

युझवेंद्र चहलने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला जाण्यापूर्वी धनश्री वर्मासोबत साखरपुडा केला होता. आणि आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी धनश्री वर्मा दुबईला देखील गेली होती. व त्यावेळी ती युझवेंद्र चहल सहभागी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सपोर्ट देखील करताना पाहायला मिळाले होते. 

पाक-न्यूझीलंड लढतीनंतर रंगली गुरु-शनीची चर्चा! फोटो व्होतोय व्हायरल

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तसेच ती यू ट्यूबर आहे. व ती सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करत असते. याशिवाय तिची स्वतःची डान्स ऍकॅडमी देखील आहे.       


​ ​

संबंधित बातम्या