क्रिकेटर जयदेव उनादकटचे शुभमंगल; पहा खास फोटो

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

गुजरातमधील ऐतिहासिक वारसा असणारे आनंदपूर सध्याचे नाव आणंद या शहरातील मधुबन या रिसोर्टमध्ये हा विवाहस सोहळा पार पडला.

भारतीय क्रिकेटर आणि रणजी ट्रॉफीत गुजरातच्या संघाचे नेतृत्व करणारा जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) लग्नबंधनात अडकला आहे. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत जयदेव आणि रिनी यांचा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. जयदेव आणि रिनी यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.  

गुजरातमधील ऐतिहासिक वारसा असणारे आनंदपूर सध्याचे नाव आणंद या शहरातील मधुबन या रिसोर्टमध्ये हा विवाहस सोहळा पार पडला.  जयदेव उनादकटची पत्नी रिनी ही वकील आहे. मागील वर्षी जयदेवने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला होता. जयदेवनं सोशल मीडियावर फोटो शेअर करुन यासंदर्भातील माहिती दिली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Komal Patel (@dtkomalpatel)

जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) च्या नेतृत्वाखाली बंगालला पराभूत करत सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी जिंकली होती.  सौराष्ट्रच्या संघाने  76 वर्षानंतर रणजी ट्रॉफीवर नाव कोरले होते. उनादकटच्या साखरपुड्यामध्ये चेतेश्वर पुजाराही दिसला होता.  जयदेवने भारताकडून 2018 मध्ये बांगलादेश विरुद्ध टी-20 सामन्यात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.  

उनादकट टीम इंडियाकडून एका कसोटी सामन्यासह 7 वनडे सामने खेळले आहेत. 2019 च्या आयपीएल लिलावात जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) साठी राजस्थान रॉयल्सने  8.4 कोटी रुपये मोजले होते. या हंगामात तो फार काही चमक दाखवू शकला नव्हता. 2017 च्या आयपीएलमध्ये त्याने 24 विकेट घेतल्या होत्या.  


​ ​

संबंधित बातम्या