'टू कूल फॉर पूल, मेरा बेटा वॉटर बेबी है।' पांड्यानं शेअर केले खास फोटो
पांड्याने काही खास फोटो शेअर केले असून यातील आपल्या मुलासोबतच्या एका फोटोला त्याने खास कॅप्शन दिले आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सध्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाच भाग आहे. पहिल्या सामन्यात बाकावर बसवण्यात आलेल्या हार्दिक पांड्यासोबत त्याची पत्नी नताशा आणि मुलगा अगस्ताही हे देखील चेन्नईतच आहेत.
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबियांना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे. खेळाडूंसोबत असणाऱ्या सदस्यांनाही कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने पत्नी आणि मुलासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला.
हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांसोबतचा आनंदी क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये नताशा स्टॅनकोविक आणि अगस्त्य हा देखील दिसतोय.
पांड्याने काही खास फोटो शेअर केले असून यातील आपल्या मुलासोबतच्या एका फोटोला त्याने खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलंय की 'टू कूल फॉर पूल, मेरा बेटा वॉटर बेबी है।' यासोबतच त्याने नताशासोबतही काही खास फोटो कॅप्चर केले आहेत.
हार्दिक पांड्याने 2018 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. पाठिच्या दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आयपीएलनंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित षटकाच्या सामन्यातही खेळताना दिसला. मात्र कसोटी संघाचा तो भाग नव्हता. आता त्याला पुन्हा कसोटी मालिकेत संघात सामील करुन घेण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळणार का? पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हार्दिक पांड्याने 2020 च्या सुरुवातीलाच नताशासोबत साखरपुडा उरकून घेतला. त्यानंतर त्याने मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्नही उरकून घेतले. 30 जुलैला 2020 रोजी नताशाने अगस्त्यला जन्म दिला.