पहिल्या पत्नीला 5 मुलं: क्रिकेटरची दुसऱ्या 'इनिंग'ची तयारी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 13 November 2020

अफगाणिस्तानमधील एका पत्रकाराने यासंदर्भात ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या असगर अफगानने दुसऱ्यांदा साखरपुडा केलाय. त्याच्या पहिल्या पत्नीला 5 मुलं असल्याचा उल्लेख करत संबंधित पत्रकाराने असगरला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार असगर अफगान नवा संसास थाटण्याच्या तयारीत आहे. काबुलमध्ये वास्तव्यास असलेल्या मध्य फळीतील फलंदाजाने दुसरा साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. यापूर्वी त्याचे विवाह झाला असून असगरच्या पहिल्या पत्नीला 5 मुलं देखील आहेत.

अफगाणिस्तानमधील एका पत्रकाराने यासंदर्भात ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या असगर अफगानने दुसऱ्यांदा साखरपुडा केलाय. त्याच्या पहिल्या पत्नीला 5 मुलं असल्याचा उल्लेख करत संबंधित पत्रकाराने असगरला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

 संघ ऑस्ट्रेलियात, रोहित भारतात

असगर अफगान हा अफगानिस्तान क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. 2009 मध्ये त्याने स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 111 वनडे सामन्यात त्याने 2356 आणि 69 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1248 धावा केल्या आहेत. असगरने 4 कसोटी सामने देखील खेळले असून कसोटीत त्याच्या खात्यात 249 धावा जमा आहेत.

2015 मध्ये मोहम्मद नबीच्या जागी अफगाणिस्तान संघाची धूरा असगर अफगान याच्याकडे देण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 56 वनडे सामन्यात 36 विजय मिळवून दिले आहेत. 2018 मध्ये असगर अफगानच्या नेतृत्वाखालील संघाने आशिया चषक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. भारताविरुद्धची लढतीमध्ये त्यांनी सामना बरोबरीत सोडला होता.  

​ ​

संबंधित बातम्या