Good News : कन्या झाल्यावर विराट म्हणाला, Please आम्हाला प्रायवसी द्या!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडीनं आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. विराटने म्हटलंय की, तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आज आमच्या घरी कन्या आली. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांसाठी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोघीही सुखरुप  आहेत. आमच्या आय़ुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात झाली असून आमच्या प्रायवसीचा तुम्ही आदर राखाल अशी अपेक्षा बाळगतो, असे विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

pic.twitter.com/js3SkZJTsH

विराट आणि अनुष्का यांचे लग्न 11 डिसेंबर 2017 मध्ये झाले होते. इटलीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. विरुष्का हे लोकप्रिय कपलपैकी एक आहे. लव्ह अफेअर ते विवाह आणि आता त्यांच्या घरी नव्या पाहुण्याच होणार आगमन यामुळे ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. या गुडन्यूजसाठीच विराट पॅटिर्निटी लिव्ह घेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला होता. 

विराट कोहली आणि अनुष्का या जोडीने आपल्या मुलाला लाईम लाईटपासून दूर ठेवणार असल्याचे यापूर्वीच म्हटले होते. खासगी आयुष्यात डोकावणाऱ्या प्रसारमाध्यमांविषयी अनुष्काने काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. अगदी हाच धागा पकडून प्रायवेसीसंदर्भात विराटने चाहत्यांना आणि अप्रत्यक्षरित्या प्रसारमाध्यमांना विनंती केल्याचे दिसते.  


​ ​

संबंधित बातम्या