होणाऱ्या बायकोसाठी कायपण! क्रिकेटपटू उचलणार मोठं पाऊल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

29 वर्षीय अष्टपैलू  आपली दुसरी इनिंग अमेरिकेतील मेजर लीग टी 20 क्रिकेटमधून होईल. अमेरिकेचे तो राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्वही करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमात रंगलेल्या चर्चेनुसार अँडरसनची होणारी पत्री उ ई मॅरी शमबर्गर ही अमेरिकन आहे. कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटजन्य परिस्थितीत अँडरसनने आपला बराच वेळ टेक्सासमध्येच घालवला आहे. अमेरिका क्रिकेटच्या मैदानात नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ऑकलँड : 36 चेंडूत शतकी खेळी करुन चर्चेत आलेला न्यझीलँडचा स्टार फलंदाज कोरी अँडरसन आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी न्यूझीलँड क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व सोडले आहे.  तो आता अमेरिकन क्रिकेटमध्ये एन्ट्री करणार आहे. लवकरच तो संयुक्त राज्य अमेरिकेकडून खळताना दिसेल.

29 वर्षीय अष्टपैलू  आपली दुसरी इनिंग अमेरिकेतील मेजर लीग टी 20 क्रिकेटमधून होईल. अमेरिकेचे तो राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्वही करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमात रंगलेल्या चर्चेनुसार अँडरसनची होणारी पत्री उ ई मॅरी शमबर्गर ही अमेरिकन आहे. कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटजन्य परिस्थितीत अँडरसनने आपला बराच वेळ टेक्सासमध्येच घालवला आहे. अमेरिका क्रिकेटच्या मैदानात नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

''आजपर्यंत अशा अफलातून गोलंदाजांचा सामना केला नव्हता''

अमेरिकन क्रिकेटमध्ये जाण्यासाठी ज्या नावांची चर्चा आहे त्यात पाकिस्तानचा कसोटीपटू सामी असलम आणि इंग्लंडच्या  2019 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील लियाम प्लंकेट यांची नावेही चर्चेत आहेत.  दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटर रस्टी थेरॉन आणि डेन पिडट यांनी यापूर्वीच यूएसएकडून खेळण्याची तयारी दर्शवली आहे. 

AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

उल्लेखनिय आहे की, अमेरिकन मेजर लीग टी 20 क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा एखादा संघ खेळण्याचीही शक्यता आहे. नुकतेच कोलकाताने फ्रेंचायजीसोबत करार केल्याची माहिती समोर आली होती. ही स्पर्धा 2021 पासून खेळवण्यात येणार होती. पण कोविड 19 मुळे स्पर्धा 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या