कुस्तीपटू बबिताची स्वप्नपूर्ती; मातृत्वाच्या गोड बातमीसह शेअर केला बाळाचा फोटो

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

तिने सोशल मीडिया पोस्टवरुन आपल्या मुलाचा फोटो शेअर करताना लिहिलंय की, आमच्या मुलाला भेटा! स्वप्नांवर विश्वास ठेवा. ती साकार होतात. 

भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या मुलाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. मुलगा झाल्याची माहिती देताना बबिताने एक खास आणि ह्दयस्पर्शी संदेशही दिला आहे. तिने सोशल मीडिया पोस्टवरुन आपल्या मुलाचा फोटो शेअर करताना लिहिलंय की, आमच्या मुलाला भेटा! स्वप्नांवर विश्वास ठेवा. ती साकार होतात. 

1 डिसेंबर 2019 रोजी कुस्तीपटू बबिता फोगाट विवेक सुहाग या कुस्तीपटूशी विवाहबद्ध झाली होती. विवाहाचा सर्वा कार्यक्रम हा मुलीच्या घरी म्हणजेच बबिताच्या घरी पार पडला होता. विवेक फक्त 21 वऱ्हाडींसह लग्नाला आला होता. कोणताही हुंडा न देता हा सोहळा पार पडला होता. विशेष म्हणजे बबिताने लग्नात 7 ऐवजी 8 फेरे घेतले होते. "बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' या मोहिमेच्या अनुषंगाने तीने आठवा फेरा घेतला होता. फोगाट कुटुंबियात ही एक परंपराच झाली आहे. गीता बबिता यांच्यानंतर संगितानेही लग्नात आठ फेरे घेतल्याचे पाहायला मिळाले होते.  

Good News : कन्या झाल्यावर विराट म्हणाला, Please आम्हाला प्रायवसी द्या!

बबिताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून देशाचे मान उंचावली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने  सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कास्य पदकाची कमाई केली होती. कुस्तीच्या आखाड्यातील लक्षवेधी कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या