ऑस्ट्रेलियाचा 'लायन' अंडरवेअरवर; फोटो होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये लायन स्पोर्ट लूक असणारी अंडरवेअर घालताना दिसत आहे. या अंडरवेअरवर जे डिझाईन दिसते त्यात लायनचा फोटो आहे.

क्रिकेटच्या मैदानातील काही खेळाडू मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या हटके अंदाजाने प्रकाशझोतात येतात. ऑस्ट्रेलियन वॉर्नरला तर आपण TikTok व्हिडिओ करतानाही पाहिलंय. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन ताफ्यातील फिरकीपटू एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. लायन अंडरवेअरवरील खास फोटोमुळे चर्चेत आलाय. सोशल मिडियावर यासंदर्भातील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये लायन स्पोर्ट लूक असणारी अंडरवेअर घालताना दिसत आहे. या अंडरवेअरवर जे डिझाईन दिसते त्यात लायनचा फोटो आहे. विशेष या फोटोत तो अपील करतानाचे चित्र दिसते. या फोटोवर हसणारी रिएक्शन देणारा लायनचा फोटोही ट्विटरवर व्हायरल होत आहे. 

ऑस्ट्रेलियन ताफ्याला शेन वॉर्ननंतर मिळालेला अनमोल रत्न म्हणून पाहिले जाते. गोलंदाजीची शैली आणि वेगवेगळ्या प्रकारे चेंडू फेकण्याची क्षमता असलेल्या 33 वर्षीय लायनने 98 कसोटी सामन्यात 394 विकेट केल्या आहेत. भारताविरुद्धच्या चार कसोटी  सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन ताफ्यातील प्रमुख गोलंदाज म्हणून लायनचा समावेश आहे. मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लायनने तीन विकेट्स घेतल्या होत्या.  हनुमा विहारी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता. 

Target_2021 : "झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित"

या कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर फार अल्प लक्ष्य होते.परिणामी लायनला दुसऱ्या डावात बॉलिंगच मिळाली नाही. लायनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 18 वेळा पाच गड्यांना बाद केले आहे. तर 16 वेळा 4 गडी बाद करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. तो केवळ गोलंदाजीत कांगारुंसाठी फायदेशीर ठरतो असे नाही. तर वेळप्रसंगी तो बॅटिंगमध्ये आपला धमका दाखवून देण्याची क्षमता बाळगून असलेला खेळाडू आहे. त्याच्या नावे कसोटीत 1 हजारहून अधिक धावांची नोंद आहे. 


​ ​

संबंधित बातम्या