विरुष्का लेकीचं नाव 'अनवि'? जाणून घ्या चर्चेमागचे कारण  

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगी झाल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख 11 होती. आणि त्यांच्या मुलीचा जन्मही 11 तारखेला झाला.

Virat Anushka Daughter Name : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मुलगी झाली आहे. विरुष्काच्या दोघांच्या ब्रेकअप-पॅचअपच्या चर्चेपासून ते त्यांच्या विवाहापर्यंत ही जोडी कायमच चर्चेत राहिली आहे. आता दोघांत तिसरी व्यक्ती आल्यावर आता याची चर्चा झाली नाहीतर नवलच ठरले असते. 

विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली होती. विशेष म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख 11 होती. आणि त्यांच्या मुलीचा जन्मही 11 तारखेला झाला. या कमालीच्या योगोयोगाची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

Good News : कन्या झाल्यावर विराट म्हणाला, Please आम्हाला प्रायवसी द्या!

विराट-अनुष्का आपल्या लेकीच नाव काय ठेवणार?, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना निश्चितच असेल. अनुष्काने ज्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला त्या ठिकाणी नोंदणी अर्जावर बाळाच नाव अनवि ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच विरुष्काच्या लेकीच नाव अनवी असल्याची चर्चा रंगत आहे.  

अनवि नावाचा नेमका अर्थ काय?

महालक्ष्मी या देवीच्या नावाला संस्कृतमध्ये अनवि असे संबोधले जाते. वनातील देवी अशा रुपात देवीला मानले जाते. विराट-अनुष्का प्राणीमात्रांवरील प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे लेकीचे नाव ते अनवि ठेवण्याला पसंती देतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या