विराटला मुलगी झाल्यावर बिग बींनी तयार केली ड्रिम टीम, धोनीच्या लेकीला केलं कॅप्टन
सर्व क्रिकेटर्संना पहिल्या लेकी आहेत, हे सांगताना बिग बींनी धोनीची लेक भविष्यात या सर्व क्रिकेटर्सच्या लेंकीची कॅप्टन असेल, असा गंमतीशीर उल्लेखही केलाय.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांना पहिल्या अपत्याच्या रुपात मुलगी झाली. सोशल मीडियावर या दोघांवरही शुभेच्छाचा वर्षाव सुरुच आहे. विरुष्काला शुभेच्छा देणाऱ्या दिग्गज मंडळींमध्ये बिग बींच्या नावाचाही समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खास ट्विट करत महानायक अमिताभ बच्चन यांनी विराट विशेष पक्तींत सामील झाल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बिग बींनी केलेल ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये 13 क्रिकेटर्सची नावे आहेत. सर्व क्रिकेटर्संना पहिल्या लेकी आहेत, हे सांगताना बिग बींनी धोनीची लेक भविष्यात या सर्व क्रिकेटर्सच्या लेंकीची कॅप्टन असेल, असा गंमतीशीर उल्लेखही केलाय.
T 3782 - An input from Ef laksh
"... and Dhoni also has daughter .. will she be Captain '' pic.twitter.com/KubpvdOzjt
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैना, गौतम गंभीर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, अश्विन, रहाणे, रविंद्र जडेजा, पुजारा, सहा, भज्जी, नटराजन आणि उमेश यादव यांचे पहिले अपत्य हे मुलगीच आहे. त्यानंतर विराटही या पक्तींत आलाय. धोनीची लेक झिवा ही या सर्व क्रिकेटर्सच्या मुलींची कॅप्टन असेल, असे बिग बींनी म्हटलंय.