अखेर ठरलं! संजनानंच काढली बुमराहची विकेट

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 13 March 2021

बुमराह 14 ते 15 मार्चला गोव्यात लग्न करण्याची शक्यता आहे. कोरोना असल्यामुळे या लग्नसोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना बोलावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात तो खेळला नव्हता. वैयक्तिक कारणास्तव सुट्टी घेत असल्याचं बुमराहनं बीसीसीआयला सांगितलं होतं. त्यानंतर बुमराह लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान, बुमराह नेमकं लग्न कोणाशी करणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. अद्याप बुमराहकडून अधिकृतपणे याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही.

स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशन हिच्यासोबतच बुमराहचं लग्न होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर आता अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने दोघांचे लग्न लवकरच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बुमराह 14  ते 15 मार्चला गोव्यात लग्न करण्याची शक्यता आहे. कोरोना असल्यामुळे या लग्नसोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना बोलावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तारा शर्माने तिच्या इन्स्टाग्रमावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जसप्रीत बुमराह, तारा आणि तिची मुलं दिसत आहेत. फोटो शेअर करताना ताराने दिलेल्या कॅप्शनमुळे बुमराहचं संजनासोबत लग्न होणार हे कन्फर्म झालं आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना तुम्हाला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तारा शर्मा शोमध्ये तुझ्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार, तसंच सहाव्या हंगामात तुम्हाला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा असं तिने म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ - पंतचा इश्कवाला रिस्की शॉट; तोही जोफ्राला 

कोण आहे संजना गणेशन 
संजना पहिल्यांदा 2012 मध्ये स्प्लिट्सविला 7 मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. त्यावेळी दुखापत झाल्यानं तिला कार्यक्रम सोडावा लागला होता. त्यानंतर संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेलही होती. तिनं  'फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस' पुरस्कार जिंकला असून  '2021 फेमिना स्टाईल दिवा' फॅशन शो मध्येही ती सहभागी झाली होती. संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. संजनाने 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपवेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅच पॉइंट आणि चिकी सिंगल्स हे कार्यक्रम केल होते. याशिवाय ती प्रीमिअर बॅडमिंटल लीगची होस्टसुद्धा होती. 


​ ​

संबंधित बातम्या