'Happy Birthday Don' ; सर ब्रॅडमन यांच्यासाठी डुडल

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रॅडमन यांच्याशी कायम तुलना करण्यात आली. पण, सचिनने आपण या महान खेळाडूच्या जवळही आपण पोहचू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ब्रॅडमन यांनी एकदा सचिनमध्ये माझे प्रतिबिंब दिसत असल्याचे एकदा म्हटले होते.  

नवी दिल्ली : क्रिकेटचे पितामह अशी ओळख असलेले महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त गुगलकडून त्यांना डुडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे.

सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथे जन्म झाला होता. क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून ब्रॅडमन यांची ओळख आहे. त्यांना 'द डॉन' या नावानेही ओळखले जाते. जगभरातील महान क्रिकेटपटू ब्रॅडमन यांना आदर्श मानतात. त्यामुळेच गुगलनेही त्यांच्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलच्या अक्षरातच ते चेंडू मारतानाचे रेखाचित्र डुडलमध्ये घेण्यात आले आहे.

पाच फूट आठ इंच उंची असलेल्या या फलंदाजाने त्या काळात जगभरातील गोलंदाजांची पिसे काढली होती. त्यांची फलंदाजीतील सरासरीच सर्वकाही सांगून जाते. ब्रॅडमन यांनी खेळलेल्या 52 कसोटी सामन्यात 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या. यामध्ये 29 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणी सामन्यातही ब्रॅडमन यांचे अद्भूत विक्रम आहे. त्यांनी खेळलेल्या 234 सामन्यांत 28067 धावा केल्या आहेत, यात 117 शतके आणि 69 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची 334 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. तर, प्रथम श्रेणीत 452 धावांची सर्वोच्च खेळी आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रॅडमन यांच्याशी कायम तुलना करण्यात आली. पण, सचिनने आपण या महान खेळाडूच्या जवळही आपण पोहचू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ब्रॅडमन यांनी एकदा सचिनमध्ये माझे प्रतिबिंब दिसत असल्याचे एकदा म्हटले होते.  


​ ​

संबंधित बातम्या