गुगलची डुडलद्वारे दिलीप सरदेसाईंना आदरांजली

वृत्तसंस्था
Wednesday, 8 August 2018

गुगलने आज (8 ऑगस्ट) भारताचे माजी फलंदाज दिलीप सरदेसाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. सरदेसाईंचा आज 78वा वाढदिवस आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाज अशी त्यांची ओळख होती. 

मुंबई : गुगलने आज (8 ऑगस्ट) भारताचे माजी फलंदाज दिलीप सरदेसाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. सरदेसाईंचा आज 78वा वाढदिवस आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाज अशी त्यांची ओळख होती. 

दिलीप सरदेसाई यांनी १९५९-६०च्या दरम्यान आंतरमहाविद्यालयीन रोहिंटन बॅरिआ ट्रॉफीमध्ये 435 धावा करत आपला खेळ लोकांच्या नजरेत आणला. त्यांनी 1960-61 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुण्यात झालेल्या या सामन्यात त्यांनी 194 मिनिटांमध्ये 87 धावा केल्या. रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या पाच क्रिकटपटूंमधील ते एक होते. 

छातीत संसर्ग झाल्याने 2 जुलै 2007मध्ये  बॉम्बे रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

संबंधित बातम्या