गोल्फमधील वाणी कपूरचा माईलस्टोन

मुकुंद पोतदार
Friday, 8 February 2019

वाणी कपूर नाव ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर अभिनेत्री-मॉडेल येईल. शुद्ध देसी रोमान्स चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. पण याच नावाची आणि दिल्लीचीच एक मुलगी गोल्फ खेळते. ती सुद्धा कमाल करते आहे.

गोल्फमधील या वाणी कपूरविषयी- 
वीसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून भारतीय क्रीडा क्षेत्रात मुली चमकायला लागण्याचे प्रमाण वाढले. टेनिसमध्ये सानिया मिर्झा, बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल, मग पी. व्ही. सिंधू, स्क्वाशमध्ये जोश्ना चिनाप्पा, दिपीका पल्लीकल, बुद्धिबळात कोनेरू हम्पी, द्रोणावली हरिका असे चेहरे चमकू लागले.

गोल्फमध्ये ही परंपरा आदिती अशोकने निर्माण केली. रिओ ऑलिंपिकला पात्र ठरत तिने भारताच्या क्रीडा इतिहासात स्थान मिळविले. तिच्या जोडीला आणखी एक नाव गाजते आहे ते वाणी कपूरचे. वाणी कपूर नावाची अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा आहे. हेच नाव भारतीय गोल्फमध्ये अलिकडे गाजते आहे.
वाणी ही ऑस्ट्रेलियन लेडीज प्रोफेशन गोल्फ असोसिएशनच्या टूरला पात्र ठरलेली पहिली भारतीय स्पर्धक ठरली. पहिल्यावहिल्या पात्रता स्पर्धेत तिने कार्ड मिळविले. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतातील बॅलाराट गोल्फ क्लबवर ही स्पर्धा झाली. वाणीने अनुक्रमे 71, 78 व 69 दोषांकांसह 2-ओव्हर-218 अशी कामगिरी नोंदविली. ती तीन जणींसह संयुक्त बारावी आली. या स्पर्धेत 81 जणींनी भाग घेतला होता. त्यातील पहिल्या 20 जणींना ऑस्ट्रेलियन एलपीजीएचे कार्ड मिळाले.

या स्पर्धेत आणखी तीन भारतीय मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात दिक्षा डागर, आस्था मदन व रिधीमा दिलवारी यांचा समावेश होता. दिक्षा संयुक्त 30वी, आस्था संयुक्त 37वी, तर रिधीमा संयुक्त 57वी ठरली.
आता वाणीच्या कामगिरीचे महत्त्व आणि तिने गाठलेला माईलस्टोन याची चर्चा करूयात. यासाठी आपण महिला क्रिकेटचे उदाहरण घेऊयात. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी ऑस्ट्रेलियातील वूमन्स बीग बॅश लीगमध्ये भाग घेतला. या दोघींची कामगिरी चर्चेचा विषय ठरली. त्यातही स्मृतीला इंग्लंडमधील टी-20 लिगमध्ये संधी मिळाली.
वाणीने प्रतिष्ठेच्या व्हिक्टोरिया ओपनची पात्रता सुद्धा साध्य केली. ऑस्ट्रेलियन एलपीजीए आणि युएस एलपीजीए या संघटनांची संयुक्त मान्यात असलेली ही स्पर्धा आहे. त्यासाठी प्ले-ऑफ झाला होता. तिसऱ्या प्ले-ऑफ होलला वाणीने पात्रतेवर शिक्कामोर्तब केले.

या स्पर्धेद्वारे वाणी एलपीजीए पदार्पण करेल. त्याशिवाय ती ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेडीज युरोपीयन टूरच्या तीन स्पर्धांतही भाग घेईल.

दिल्लीची वाणी 24 वर्षांची आहे. 2012 मध्ये तिने व्यावसायिक पदार्पण केले. त्यानंतर तिने गाठलेला हा माईलस्टोन कौतुकास्पद ठरतो. त्यामुळे मुली गोल्फकडे आकर्षित होण्यात नक्कीच चालना मिळेल.

ऑल दी बेस्ट वाणी

संबंधित बातम्या