बरं झालं जडेजा आधीच्या सामन्यात नाही खेळला : पॉल फॅब्रेस

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

लंडन : सर जडेजा अशी ओळख असलेल्या रवींद्र जडेजाच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे इ्ंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल फॅब्रेस यांनी जडेजा हा सर्वांत धोकादायक क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.

लंडन : सर जडेजा अशी ओळख असलेल्या रवींद्र जडेजाच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे इ्ंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल फॅब्रेस यांनी जडेजा हा सर्वांत धोकादायक क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.

जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना नाबाद 86 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडला फक्त 40 धावांची आघाडी घेता आली. त्याने पहिल्या डावात गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याने चार बळी मिळविले होते. गेल्या चारही सामन्यांत संघाबाहेर असलेल्या जडेजाने आपल्या अष्टपैलू खेळीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. पॉल फॅब्रेस यांनी जडेजाचे कौतुक करत तो सर्वांत धोकादायक क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.

पॉल फॅब्रेस म्हणाले, की जडेजाला विरोधी संघाने यापूर्वी का खेळविले नाही, माहित नाही. जडेजाला आर. अश्विन आणि हार्दिक पांड्या यांच्या ऐवजी आगोदर संधी मिळायला हवी होती. जडेजाने तळाच्या फलंदाजांच्या साथीने सर्वोत्तम खेळी केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याची कामगिरी सर्वोत्तम झाली. त्यामुळे मी आनंदी आहे, की तो फक्त शेवटच्या सामन्यात खेळला. तो खरंच एक चांगला क्रिकेटपटू आहे.


​ ​

संबंधित बातम्या