•WWWW• | •1•••• | •W•••• अनुराधाची कमाल; मलिंगा-राशिदची बरोबरी करत रचला विश्वविक्रम!

सुशांत जाधव
Sunday, 16 August 2020

टी-20 क्रिकेटच्या मैदानात अनुराधाने केलेला पराक्रम हा पुरुष आणि महिला गोलंदाजाकडून नोंदवलेली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे.

जर्मन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुराधा डोडाबल्लापुरने क्रिकेटच्या मैदानात नवा पराक्रम करुन दाखवलाय.  महिला टी-20 क्रिकेट सामन्यात तिने ऑस्ट्रियाविरुद्ध विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली.  14 ऑगस्ट रोजी रंगलेल्या सामन्यात तिने 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटला ब्रेक लागला होता. या आठवड्यात महिला क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. कोरोनातून सावरताना खेळवण्यात आलेल्या जर्मन विरुद्ध ऑस्ट्रिया यांच्यातील सामन्यात अनुराधाने विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली. 

धोनी क्रिजमध्ये पोहचला नाही तो नाहीच!

जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता महिला क्रिकेटही सावरत आहे. ऑस्ट्रिया आणि जर्मन यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील 14 ऑगस्ट रोजी रंगलेल्या सामन्यात उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अनुराधाने 1 धावा खर्च करून  5 विकेट मिळवल्या. यात तिने 4 चेंडूत 4 विकेट टिपल्या. तिच्या कामगिरीच्या जोरावर जर्मनने चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत जर्मन महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघाला 5-0 असे पराभूत केले.  

VIDEO - धोनीचे चाहते हा क्षण कधीच विसरणार नाहीत

टी-20 क्रिकेटच्या मैदानात अनुराधाने केलेला पराक्रम हा पुरुष आणि महिला गोलंदाजाकडून नोंदवलेली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. यापूर्वी श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने असा पराक्रम केला होता. अनुराधाने ऑस्ट्रियातील डावातील 15 व्या षटकात ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घातली. तिने जो एंटोनिटे स्टिग्लिट्ज (1), टूग्से कजांची (0), अनीशा नूकला (0) आणि प्रिया सबू (0) यांना लागोपाठ तंबूचा रस्ता दाखवला.  33 वर्षीय अनुराधा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचेही प्रतिनिधीत्व केले आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या