बॉयकॉट यांचा इंग्लंड संघाला घरचा आहेर

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

इंग्लंडचे माजी सलामीवीर जेफ्री बॉयकॉट यांनी चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही सर्वोत्तम फलंदाजांची फळी नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि त्यामुळेच इंग्लंडचा कसोटी संघ मागे पडत आहे.''

लंडन : इंग्लंडचे माजी सलामीवीर जेफ्री बॉयकॉट यांनी चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही सर्वोत्तम फलंदाजांची फळी नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि त्यामुळेच इंग्लंडचा कसोटी संघ मागे पडत आहे.''

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला काल (गुरुवार) एजेस बाऊलच्या मैदानावर सुरवात झाली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करायला लावले. भारतीय फलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या 86 धावांमध्ये इंग्लंडचे सहा फलंदाज बाद केले. सॅम करनच्या 78 धावांमुळे इंग्लंडला दिवसाअखेर 246 धावा करता आल्या. 

इंग्लंडच्या फलंदाजीची मदार असलेल्या किटॉन जेनिंग्ज, कर्णधार ज्यो रुट आणि जॉनी बेअरस्टो  तिघही एकेरी धावा करुन बाद झाले. त्यामुळे इंग्लंडचा संघ चांगलाच अडचणीत आला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा डाव सावरणाऱ्या बेन स्टोक्स आणि जॉस बटलरलाही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. 

ते म्हणाले, ''फलंदाजी करणे अवघड जात असेल, तर फलंदाजीतील त्रुटी तुम्हाला कायमच छळणार.''
इंग्लंडने गेल्या तीन वर्षांत 63 पैकी 32 डावांत शंभर धावा पूर्ण करण्याआधीच आपले चार फलंदाज गमावले आहेत. पहिल्या दिवसाअखेर भारताने एकही फलंदाज न गमावता 19 धावा केल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या