टायगर पतौडींचा खेळ त्या इंग्रजाच्या डोळ्यात खुपलेला; सैफनं शेअर केला किस्सा

सुशांत जाधव
Monday, 20 July 2020

तौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने याबाबतचा किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितलाय. इंग्लंडचे माजी कर्णधार जॅफ्री बॉयकॉट यांच्या एका विधानावर वडील चांगलेच संतापल्याचे त्यांने म्हटले आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांनी एका डोळ्याने दिसत नसतानाही मैदान गाजवल्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील. अपघातामध्ये डोळा गमावल्यानंतर ते क्रिकेट खेळू शकतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण प्रचंड इच्छा शक्ती असेल तर अशक्य काहीच नसते, हेच त्यांनी मैदानात उतरुन दाखवू दिले होते. एका इंग्रजाला त्यांचा हा लढवय्यापणा रुचला नाही. पतौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने याबाबतचा किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितलाय. इंग्लंडचे माजी कर्णधार जॅफ्री बॉयकॉट यांच्या एका विधानावर वडील चांगलेच संतापल्याचे त्यांने म्हटले आहे. 

धोनीनं खूप ट्रॉफ्या जिंकून दिल्या असल्या तरी... माझं मत दादालाच!

स्पोर्ट्सकीडा बेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफ म्हणाला की,  इंग्लंडचे माजी कर्णधार बॉयकाट यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. त्यांनी वडिलांसंदर्भात शंका उपस्थितीत करुन दुखावले. तुझ्या वडिलांच्या खेळाबद्दल खूप ऐकलं आहे. एका डोळ्याने कसोटी सामना खेळणे शक्य नाही, असे ते  म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर वडील खोटे बोलतात असे वाटते का? असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावेळी त्यांनी मला चक्क  हो.. असे उत्तर दिले. एका डोळ्याने दिसत नाही ही कहाणी रचली गेली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केल्याचे सैफने सांगितली. ही गोष्ट जेव्हा वडिलांना सांगितली त्यावेळी ते संतापले. दोन्ही डोळ्यांनी दिसत होते त्यावेळी मी सर्वोत्तम खेळायचो आणि एका डोळ्यांनी चांगला असे वडिलांनी म्हटले होते, हा किस्साही सैफने यावेळी शेअर केला. किस्साही सैफने शेअर केला.   

चलो दुबई...जुळवाजुळव सुरु

क्रिकेट चाहत्यांमध्ये टायगर पतौडी नावाने प्रसिद्ध असलेले मंसूर अली खान यांनी भारतीय संघासाठी 46 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 40 सामन्यात त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. एका कार अपघातामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याला इजा पोहचली. त्यानंतरही ते क्रिकेटच्या मैदानात उतरुन उत्तम क्रिकेट खेळले.  46 कसोटी सामन्यात 6 शतक आणि 16 अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी आपल्या खात्यात 2793 धावा जमवल्या आहेत. नाबाद 203 धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 9 कसोटी सामने जिंकले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पतौडी यांनी 310 सामन्यात 15425 धावा केल्या आहेत. यात 33 शतक आणि 75 अर्धशतकांचा समावेश आहे. 


​ ​

संबंधित बातम्या