माझा विक्रम फक्त 'तो'च मोडेल : मॅकग्रा 

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज 
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) : 800 
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : 708 
अनिल कुंबळे (भारत) : 619 
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) : 563 
जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 557 
कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) : 519 
कपिलदेव (भारत) : 434 
रिचर्ड हॅडली(न्यूझीलंड) : 431 
रंगना हेराथ (श्रीलंका) : 430 
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 427

लंडन : ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडण्यापासून इंग्लंडचा जेम्स अँडरसन अवघ्या काही विकेट्‌सच दूर आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत मॅकग्रा सध्या अव्वल स्थानी आहे. त्याची ही कामगिरी मागे टाकण्यासाठी अँडरसनला आणखी सात विकेट्‌सची गरज आहे. 

मॅकग्राने 2007 मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने एकूण 563 विकेट्‌स घेतल्या. 36 वर्षीय अँडरसनने आतापर्यंत 557 विकेट्‌स घेतल्या आहेत. 'अँडरसनविषयी मला आदर आहे. हा विक्रम त्याने मोडल्यानंतर दुसरा कोणताही गोलंदाज अशी कामगिरी करू शकणार नाही', असे मॅकग्राने 'डेली मेल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. 

'हल्लीचे क्रिकेट बदलले आहे. ट्‌वेंटी-20 सामन्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकदा अँडरसनने सर्वाधिक बळींचा विक्रम केला, की त्याच्या जवळपास कुणी जाऊ शकते का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. कसोटीमध्ये वेगवान गोलंदाजी हा सर्वांत कठीण प्रकार आहे. सातत्याने दर्जेदार कामगिरी करण्यासाठी मैदानाबाहेरही किती मेहनत घ्यावी लागते, याची बहुतेकांना कल्पनाही नसते. सलग 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असूनही अँडरसन अजूनही 'टॉप' गोलंदाज आहे', असे मॅकग्रा म्हणाला. अँडरसनने ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांविरुद्ध प्रत्येकी शंभर बळी घेण्याचीही कामगिरी केली आहे. 

स्विंगला पोषक नसलेल्या वातावरणात अँडरसन फारसा प्रभावी ठरत नसल्याची टीकाही त्याच्यावर होत नसते. त्याच्या आतापर्यंतच्या 557 पैकी 361 विकेट्‌स इंग्लिश वातावरणातच मिळाल्या आहेत. 

कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज 
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) : 800 
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : 708 
अनिल कुंबळे (भारत) : 619 
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) : 563 
जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 557 
कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) : 519 
कपिलदेव (भारत) : 434 
रिचर्ड हॅडली(न्यूझीलंड) : 431 
रंगना हेराथ (श्रीलंका) : 430 
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 427


​ ​

संबंधित बातम्या