'दंगल'मुळे मी भरकटले : गीता फोगट

वृत्तसंस्था
Thursday, 16 August 2018

भारताची राष्टकुल सुवर्ण पदक विजेती गीता फोगट हिने दिर्घकाळ झालेली दुखापत आणि दंगल सिनेमाच्या झगमगाटामुळे माझे खेळावरील लक्ष भरकटल्याचे मान्य केले आहे. जेएसडब्ल्यू इनस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या लॉन्चिंगदरम्यान ती बोलत होती.  

विजयनगर : भारताची राष्टकुल सुवर्ण पदक विजेती गीता फोगट हिने दिर्घकाळ झालेली दुखापत आणि दंगल सिनेमाच्या झगमगाटामुळे माझे खेळावरील लक्ष भरकटल्याचे मान्य केले आहे. जेएसडब्ल्यू इनस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या लॉन्चिंगदरम्यान ती बोलत होती.  

गीता व बबिता फोगट या दोघांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या दंगल या सिनेमामुळे त्या दोघी घराघरात पोहोचल्या. 

परंतू मागील काही दिवसांपासून दोघी फोगट बहिणी सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसून गीतला दुखापतींनी ग्रासले आहे. ''मागील दोन वर्षांपासून सिनेमा आणि दुखापतींमुळे माझे लक्ष भरकटले होते मात्र आता मी फक्त कुस्तीवर लक्ष केंद्रित करणार आहे. मी संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहे. कोणत्याही खेळात दिर्घकाळ बाहेर राहिल्यावर पुनरागमन करणे अवघड असते.'' असे मत तिने व्यक्त केले. 

''मागील वर्षी फक्त दोन पदके जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते. मात्र विनेश, साक्षी आणि पूजा यांना मी राष्ट्रीय कॅम्पला पाहिले आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून यावर्षी आम्ही जास्त पदके जिंकण्याचा प्रयत्न करु.'' असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. 

संबंधित बातम्या