आशियाई विजेते क्रिकेटपटूंपेक्षा खरे हिरो : गौतम गंभीर
क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना खूपच संघर्षाचा सामना करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीतून येऊन ते यश मिळवतात. त्यांनी पदक जिंकले नसते, तर त्यांना कोणीही ओळखले नसते. त्यांची कामगिरी आम्हा अनेक क्रिकेटपटूंपेक्षा सरस आहे.
नवी दिल्ली : क्रिकेटच्या भारतातील प्रचंड लोकप्रियतेमुळेच क्रिकेटपटू हिरो होतात. एशियाडपदक विजेते खरे हिरो आहेत, असे भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने एका मुलाखतीत सांगितले.
एशियाडपदक विजेत्यांची कहाणी ऐकली की, त्यांनाच खरे हिरो म्हणता येईल. स्वप्ना बर्मनचेच बघा. तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवले. बॅडमिंटन, नेमबाजांचे यश बघायला हवे. त्यांच्या कठोर मेहनतीस हे यश मिळाले. क्रिकेटपेक्षा अन्य खेळांत खूपच जास्त हिरो आहेत.
क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना खूपच संघर्षाचा सामना करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीतून येऊन ते यश मिळवतात. त्यांनी पदक जिंकले नसते, तर त्यांना कोणीही ओळखले नसते. त्यांची कामगिरी आम्हा अनेक क्रिकेटपटूंपेक्षा सरस आहे. आम्ही क्रिकेटपटूही देशासाठी सर्वस्व पणास लावतो; पण क्रिकेटमध्ये सुविधा आहेत. खेळाडूंना अन्य खेळांच्या तुलनेत खूप जास्त पैसा मिळतो. पण, या पदक विजेत्यांनी संघर्ष करीत देशासाठी इतिहास घडवला आहे, असेही गंभीर म्हणाला.