गौतम गंभीरचे तृतीयपंथीयांसोबत रक्षाबंधन

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

गंभीर हा गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. त्याने नुकतेच काश्मीरी पोलिस जोहरा हिच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही उचलला होता. 

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने आज (रविवार) रक्षाबंधनाचा सण चक्क तृतीय पंथीयांकडून राखी बांधून साजरा केला. गौतमच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

गौतम गंभीरने आज ट्विटरवर तृतीय पंथियांसोबत रक्षाबंधन साजरे केल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यावेळी त्याने लिहिले होते, की आज मला आनंद होत आहे तृतीयपंथी समाजातील दोन व्यक्तींकडून मी राखी बांधून घेत आहे. अभिना अहेर आणि सीमरन शेख या दोघींची नावे आहेत, माणूस म्हणून मला याचा मला अभिमान आहे.

गंभीर हा गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. त्याने नुकतेच काश्मीरी पोलिस जोहरा हिच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही उचलला होता. 

​ ​

संबंधित बातम्या