अन् विंडीजच्या कर्णधाराने वाडेकरांना पाठविले नवे बूट

वृत्तसंस्था
Thursday, 16 August 2018

वानखेडेवर झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स हेही अजित वाडेकरांचा खेळ पाहून भारावून गेले होते.   

मुंबई : वानखेडेवर झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स हेही अजित वाडेकरांचा खेळ पाहून भारावून गेले होते.   

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. त्यावेळी वाडेकरांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. परंतू ते सराव करताना वाडेकरांचे कौतुक करू शकत नव्हते.

सराव करताना वाडेकर उत्तम फटके मारत होते. मात्र पायातील बूट चांगल्या स्थितीत नसल्यामुळे त्यांच्या पायाची हालचाल नीट होत नव्हती. हे सोबर्स यांच्या लक्षात आले. सरावानंतर वेस्ट इंडीचचे खेळाडू हॉटेलमध्ये गेले, तर भारताचे काही खेळाडू थोड्यावेळासाठी घरी गेले.

Ajit Wadekar

वाडेकर घरी पोहोचल्यावर त्यांना आपल्या नावाने कोणीतरी भेट देऊन गेल्याचे लक्षात आले. वाडेकरांनी बॉक्स उघडून पाहिला तर त्यात नवे कोरे बूट होते आणि त्याबरोबर एक पत्र होते. ते पत्र सोबर्स यांनी लिहिले होते आणि वाडेकरांना त्यांच्या उत्तम खेळीसाठी शुभेच्छा म्हणून त्यांनी हे बूट भेट केले होते.

संबंधित बातम्या