Friendship Day Special : ही दोस्ती तुटायची नाय...!

सुशांत जाधव
Sunday, 2 August 2020

जेवढ्या वेळा दोघांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली त्यातील बऱ्याचदा पहिल्या चेंडूचा सामना हा सौरव गांगुलीच करताना पाहायला मिळाले.

सौरव दा अन् सचिन भारतीय संघातीलच नव्हे तर क्रिकेट जगतातील धडाकेबाज सलामीवीरांच्या यादीतील अव्वल जोडी. अद्यापही या जोडीला तोड मिळालेली नाही. 1996-2007 दरम्यान सचिन-गांगुली जोड गोळीनं 136 वेळा भारताच्या डावाची सुरुवात केली. यात त्यांनी 21 शतकी अन् 23 अर्धशतकी भागीदारीसह 6609 धावा केल्या. डावाची सुरुवात करणाऱ्या गड्यांनी केलेली क्रिकेटच्या मैदानातील ही विश्व विक्रमी धावसंख्या आहे. 'राइट-लेफ्ट कॉम्बिनेशन'च्या ऑन फिल्ड परफॉमन्ससारखीचं ऑफ फिल्ड फ्रेंण्डशिपही दमदार आहे. जवळपास 25 वर्षांपासून एकत्र असलेल्या जोडीचे मैदानातील आणि मैदानाबाहेरील काही खास किस्से त्यांच्यातील मैत्रीचं नातं किती घट्ट होतं अन् आहे याची अनुभूती देणारे असेच आहे.   

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

सचिन भारतीय संघाचा कर्णधार असताना गांगुलीला सलामीवीर म्हणून संधी मिळाली होती. पुढे जाऊन गांगुली भारतीय संघाचा कर्णधार झाला. जेवढ्या वेळा दोघांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली त्यातील बऱ्याचदा पहिल्या चेंडूचा सामना हा सौरव गांगुलीच करताना पाहायला मिळाले. गांगुली कर्णधार असला तरी स्ट्राइकपेक्षा नॉन स्टाइकला खेळण्याची  आपलीच गोष्ट सचिन खरी करायचा. त्याच्याकडे याची कारणही ठरलेली असायची. फॉर्ममध्ये असताना आणि आउट फॉर्ममध्ये असताना गांगुलीला तो कसा पटवून द्यायचा याचा किस्सा गांगुलींना एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. आरे कधी तर पहिल्या चेंडूचा सामना कर! असे गांगुली ज्यावेळी सचिनला सांगायचा त्यावेळी सचिनकडे दोन कारण तयार असायची. फॉर्मध्ये असताना सचिन म्हणायचा की, आता मी फॉर्ममध्ये आहे त्यामुळे नॉन स्ट्राइकलाच खेळणं बरं पडेल. जेव्हा आउट ऑफ फॉर्म असताना दबाव कमी होईल, असे सांगत तो नॉन-स्ट्राईकला चिटकून राहायचा, असा किस्सा गांगुलींनी शेअर केला होता. एक-दोनवेळा सचिनच्या पुढे मैदानात येत नॉन स्टाईकची जागा घेतली. नाइलाजास्तवर सचिनला पहिल्या चेंडूचा सामना करावा लावला होता, असा किस्साही दोघांमध्ये घडला होता.

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य 

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या जोडी फोडण्याचा प्रकार मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये समोर आला होता. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही? यासंदर्भात चर्चा रंगली होती. यावेळी गांगुली आणि सचिन यांच्यात मतभिन्नता समोर आली होती. पाकिस्तानसोबत खेळलो नाही तर आपल्याला दोन गुणांचा तोटा होईल, असे सचिनने म्हटले होते. दुसरीकडे दोन पॉइंट नको वर्ल्ड कप हवा, असे विधान गांगुलींनी केले होते. या विधानानंतर सचिन-गांगुली यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमातून करण्यात आला. पण कोणताही विलंब न करता गांगुलीने आपले विधान सचिन विरोधात नसल्याचे सांगत दोन दशकाहून अधिककाळ असलेली मैत्री तुटायची नाही, अशा आशयाने प्रसारमाध्यमांतील चर्चेला पूर्ण विराम दिला होता. 


​ ​

संबंधित बातम्या