फ्रेंच टेनिस स्पर्धा होणार, परंतु अशी... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

24 मे ते 7 जून या कालावधीत होणारी फ्रेंच ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धा आता 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोधबर याकालावधीत खेळवण्यात येणार आहे.

आता 3.0 लॉकडाउनही संपत येत आहे. यामुळे लॉकडाउन वाढणार तर नाही ना, असा प्रश्नर प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे, असे असले तरी वाढती रुग्ण संख्या पाहून पुढील काही महिने परिस्थीती सामान्य होणार नाही असे वाटत असतानाच फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा बंद दाराआड खेळवण्यात येईल, असे फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष बेर्नार्ड गुइडीसेली यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व खेळांना ब्रेक लागला आहे. भारतात लोकप्रिय असलेला क्रिकेटचा मागील तीन महिन्यांपासून एकही सामना झालेला नाही. आयपीएलही होणार की नाही याबाबत शाश्वती नाही. कोरोनामुळेच टेनिस स्पर्धा मार्च महिन्यापासून स्थगित करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत जुलैपर्यंत एकही टेनिस स्पर्धा आयोजित केली जाणार नाही आहे. विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे. अमेरिकन खुली ग्रॅंडस्लॅम स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान होणार असली तरी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मात्र अद्यापही साशंकता आहे. 

"व्हिडीओ: लिएंडर पेसने संन्यास घेण्याविषयी थेट चाहत्यांना मागीतला सल्ला"

24 मे ते 7 जून या कालावधीत होणारी फ्रेंच ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धा आता 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोधबर याकालावधीत खेळवण्यात येणार आहे. मात्र, स्पर्धा लांबणीवर टाकल्याच्या निर्णयाचा बेर्नार्ड यांना कोणताही पश्चारत्ताप होत नाही. आम्ही सर्व पर्याय समोर ठेवून स्पर्धेच्या नव्या तारखा निश्चिबत केल्या आहेत. लाल मातीवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील खेळाडूंच्या आठवणी खूप चांगल्या आहेत. लाल मातीवरील ही स्पर्धा स्टेडियममध्ये तसेच टीव्हीवरून पाहण्यास खूप मजा येते. जगभरातील असंख्य चाहते स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, आता ही स्पर्धा बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 

कोरोनाचा प्रभाव कमी होईल असे वाटत नाही 
कोरोना विषाणुमुळे फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा चार महिने पुढे ढकलण्यात आली होती. काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव कमी होईल असे वाटत असल्यामुळेच हा निर्णय घेतला होता. मात्र, आता तसे संकेत दिसून येत नाही. यापुढे ही स्पर्धा बंद दाराआड खेळवण्यात येईल, असे फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष बेर्नार्ड गुइडीसेली यांनी स्पष्ट केले.


​ ​

संबंधित बातम्या