फ्रॅंक लॅम्पार्ड आता चेल्सीचा मुख्य प्रशिक्षक 

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

फुटबॉल विश्‍वातील लंडनचा आणि व्यावसायिक फुटबॉलमध्ये चेल्सीचा महान फुटबॉलपटू फ्रॅंक लॅम्पार्ड पुन्हा मैदानात उतरला आहे. खेळाडू म्हणून नव्हे, तर या वेळी तो आपल्याच चेल्सी क्‍लबचा प्रशिक्षक म्हणून समोर येणार आहे. चेल्सीने त्याच्याशी तीन वर्षाचा करार केला आहे. 

लंडन : फुटबॉल विश्‍वातील लंडनचा आणि व्यावसायिक फुटबॉलमध्ये चेल्सीचा महान फुटबॉलपटू फ्रॅंक लॅम्पार्ड पुन्हा मैदानात उतरला आहे. खेळाडू म्हणून नव्हे, तर या वेळी तो आपल्याच चेल्सी क्‍लबचा प्रशिक्षक म्हणून समोर येणार आहे. चेल्सीने त्याच्याशी तीन वर्षाचा करार केला आहे. 

निवृत्ती घेतल्यानंतर लॅम्पार्डचे फुटबॉलमधील हे पुनरागमन नाट्यमय मानले जात आहे. चेल्सीकडून 13 वर्षे फुटबॉल खेळताना सर्वाधिक 211 गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 

इंग्लंडचा हा गुणी मध्यरक्षक मैरिझिओ सारी यांची जागा घेईल. चेल्सीसाठी मैरिझिओ यांचा कार्यकाळ केवळ एक वर्षाचा राहिला. लॅम्पार्डने पुनरागमनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तो म्हणाला,""सर्वांचा माझे पहिले प्रेम माहित आहे. फुटबॉलशिवाय मी जगूच शकत नाही. चेल्सीकडून इतके वर्षे खेळायला मिळाल्यावर आता त्याच संघाचा प्रशिक्षक होणे ही बाब माझ्यासाठी आनंदाची आणि त्याहीपेक्षा अभिमानाची आहे.'' 

लॅम्पार्ड चेल्सीकडून 648 सामने खेळला असून, यात तीनवेळा प्रिमियर लीगचे विजेतेपद, चारवेळा एफए विजेतेपद आणि दोनवेळा लीग विजेतेपद त्याने मिळविले आहे. त्याच्याच कारकिर्दीत चेल्सीने युरोपा लीग आणि चॅंपियन्स लीगच्या विजेतेपदांनाही गवसणी घातली आहे. चेल्सीकडून तो तीन वेळा वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता.

संबंधित बातम्या